मुंबई :एनसीबीचे मुंबई विभागाचे माजी संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्या नावे असलेल्या बार परवाना (Bar licence) रद्द करण्यात आला आहे, ठाण्याचे जिल्ह्याधिकारी राजेश नार्वेकर (rajesh narvekar) यांनी वानखेडेंचा बार परवाना रद्द करण्याचे आदेश दिले आहेत.
याप्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागाने वानखेडे यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. वयाच्या 17व्या वर्षी नावावर बार परवाना घेतल्याने राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून (excise department) कारणे दाखवा नोटीस बाजवण्यात आली होती. राजेश नार्वेकर यांची याबाबत सहा पानी आदेश दिला आहे. यात वानखेडेंनी 1997 मध्ये बारचा परवाना घेताना खोटी कागदपत्रे सादर केल्याचे म्हटलं आहे. महाराष्ट्र प्रतिबंध कायद्याच्या कलम 54 नुसार ही कारवाई करण्यात आली आहे.
राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेत समीर वानखेडेंवर आरोप केला होता की, अवघ्या 17व्या वर्षी त्यांना बारचा परवाना मिळाला होता. नवी मुंबईत असलेला सदगुरू रेस्ट्रो बारचा परवाना हा समीर वानखेडे यांच्या नावावर होता. समीर वानखेडे यांच्या नावावर हा बारचा परवाना झाला त्यावेळी त्यांचे वय अवघे 17 वर्षे होते. अल्पवयीन असतानाही बारचा परवाना कसा मिळाला. याप्रकरणी राज्य उत्पादन शुल्काच्या ठाणे विभागाने समीर वनाखेडे यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती.
बारच्या परवान्यासाठी किमान 21 वयाची अट आहे. मात्र, असे असतानाही त्यांना बारचा परवाना मिळाला. 27 ऑक्टोबर 1997 रोजी समीर वानखेडेंच्या नावे बारचा परवाना काढण्यात आला होता. समीर वानखेडे यांचे वडील त्यावेळी उत्पादन शुल्क विभागाक कार्यरत होते. याप्रकरणी आता समीर वनाखेडे यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. तुमच्या नावे असलेला बार परवाना रद्द का करु नये अशी विचारणा करण्यात आली आहे.
ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर (Rajesh Narvekar) हे शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांचे व्याही आहेत. राऊत यांची कन्या हिचा विवाह नार्वेकर यांचा मुलगा मल्हार याच्यासोबत झाला आहे. वानखेडेंवर कारवाई करण्याची जबाबदारीही नार्वेकर यांच्यावर आली होती.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.