पुढचा मुख्यमंत्री अपक्ष, छोट्या पक्षाचे आमदार ठरवतील ; कदाचित तो प्रहारचा असेल..

अपक्ष आणि छोट्या पक्षांचा झटका काय असतो हे राज्यसभा निवडणुकीत दिसले. अपक्ष आणि छोट्या पक्षाचे आमदार म्हणतील तसेच यापुढे सरकारमध्ये होणार. (Bacchu Kadu)
State Minister Bacchu Kadu
State Minister Bacchu KaduSarkarnama
Published on
Updated on

मुंबई : नुकत्याच झालेल्या राज्यसभा आणि आज झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत अपक्ष, छोट्या पक्षांच्या आमदरांचा भाव चांगलाच वधारला आहे. (Maharashtra) राज्यसभा निवडणुकीत अपक्षांनी आपली ताकद महाविकास आघाडी (Mahavikas Agahdi) व भाजपला दाखवून दिली होती. त्यानंतर आज विधान परिषदेच्या दहा जागांसाठी झालेल्या मतदानात देखील अपक्ष आणि छोटे पक्ष जायंट किलर ठरत आहेत.

हितेंद्र ठाकूर यांची आघाडी, महाविकास आघाडी सरकारमध्ये राज्यमंत्री असलेले राज्यमंत्री बच्चू कडू व इतर अपक्षांची सरकारकडून घेतली जाणारी काळजी आणि वाढलेले महत्व पाहता पुढचा मुख्यमंत्री आम्हीच ठरवू, असा दावा राज्यमंत्री बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी केला आहे. विधान परिषदेच्या मतदानाला जातांना त्यांनी प्रसार माध्यमाशी संवाद साधला.

बच्चू कडू म्हणाले, राज्यसभेची निवडणुक आणि आज होत असलेली विधान परिषदेची निवडणुक पाहता अपक्ष आणि छोट्या पक्षांच्या आमदारांना किती महत्व प्राप्त झाले आहे, हे आपण पाहत आहोत. राज्यात सरकार कोणत्याही पक्षाचे असो अपक्ष आणि छोट्या पक्षांना डावलून चालणार नाही हेच या दोन निवडणुकांमधून स्पष्ट झाले आहे.

अपक्ष, छोट्या पक्षांची ताकद वाढली आहे आणि म्हणूनच भविष्यात मुख्यमंत्री कोण असेल हे देखील आम्हीच ठरवू. प्रहार संघटनेचा देखील मुख्यमंत्री होऊ शकतो, असा मला विश्वास आहे. अपक्ष आमदारांना मतदारांनीच निवडून दिलेले असते. मतदारसंघातील विकासकामे, त्यासाठी लागणार निधी खेचून आणण्याची ताकद पाहून लोकांनी त्यांना निवडून दिलेले असते.

State Minister Bacchu Kadu
Bjp : गिरीश महाजन म्हणाले, काॅंग्रेसचा आक्षेप म्हणजे बालिशपणाचे लक्षण

त्यामुळे विधान परिषद किंवा राज्यसभेवर सदस्य निवडून पाठवण्याच्या प्रक्रियेत अपक्षांना महत्व असतेच. अपक्ष आणि छोट्या पक्षांचा झटका काय असतो हे राज्यसभा निवडणुकीत दिसले. आता विधान परिषदेच्या निवडणुकीत देखील दिसतील. अपक्ष आणि छोट्या पक्षाचे आमदार म्हणतील तसेच यापुढे सरकारमध्ये होणार, असा विश्वास देखील कडू यांनी यावेळी व्यक्त केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com