Goa News : मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या मतदारसंघातील भाजप कार्यालयात चोरी; दोघेजण ताब्यात

Goa Political News : डिचोली पोलिसांनी या चोरीप्रकरणी दोघा संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे. हा चोरीचा प्रकार शनिवारी(ता.10 मे) रोजी घडला होता.
Goa CM Pramod Sawant
Goa CM Pramod Sawant Sarkarnama
Published on
Updated on

Goa News : गोव्यात घडणारे चोरीचे प्रकार हे आता सर्रास झालेले आहेत. चोरट्यांकडून कोणत्या वास्तू लक्ष्य बनवल्या जाणार ते सांगता येत नाही. साखळी शहरात चोरट्यांनी चक्क भाजप (BJP) कार्यालयच लक्ष्य बनविले असून आतील दोन मोबाईल फोन लंपास केल्याची माहिती समोर आली आहे.

डिचोली पोलिसांनी या चोरीप्रकरणी दोघा संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे. हा चोरीचा प्रकार शनिवारी(ता.10 मे) रोजी घडला होता. रात्रीच्या वेळी भाजप कार्यालयाचे पुढील दाराचे कुलूप तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला व आत ठेवलेले कार्यालयातील दोन मोबाईल लंपास केले.

या प्रकरणाची माहिती डिचोली पोलिस स्थानकाला मिळताच पोलिसांनी आपल्या तपासाला गती दिली. विविध माध्यमांचा वापर करून पोलिसांनी मंगळवार, १३ मे रोजी रात्री उशिरा दोघा संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्यांची तसेच या प्रकरणाची चौकशी पोलिस (Police) निरीक्षक विजय राणे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.

Goa CM Pramod Sawant
BJP News: भाजपची राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यातला जिल्हाध्यक्ष ठरवताना दमछाक; गटबाजीमुळे महिनाभर प्रक्रिया करूनही निर्णय 'पेंडिंग'च..!

विजय सरदेसाई यांचा चिमटा

"साखळी येथील भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात झालेल्या चोरीबद्दल फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई यांनी स्मार्ट चोरांनी केलेली ही स्मार्ट चोरी असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. गोव्यात चोरसुद्धा स्मार्ट झाले आहेत. त्यांना नेमके कुठल्या पक्षाकडे जास्त पैसे आहेत हे माहीत आहे."

"शिवाय पोलिस या चोरीप्रकरणी काहीच करणार नाहीत याची जाणीवही या चोरांना आहे. एका महिन्यापूर्वी करंझाळे येथील धेपे यांच्या बंगल्यात चोरी झाली. अजून त्या चोरांचा तपास लागलेला नाही. शिवाय या चोरीप्रकरणी कोणालाही जबाबदार धरण्यात आलेले नाही", असेही सरदेसाई यांनी म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com