BJP News: भाजपची राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यातला जिल्हाध्यक्ष ठरवताना दमछाक; गटबाजीमुळे महिनाभर प्रक्रिया करूनही निर्णय 'पेंडिंग'च..!

BJP District President : गेल्या काही निवडणुकांमध्ये जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व राहिले आहे. मात्र, पक्षफुटीमुळे स्थानिक राजकारणात बदल होताना दिसत आहेत. ज्या भागामध्ये दोन्ही राष्ट्रवादीमुळे भाजपला शिरकाव करण्याची संधी निर्माण झाली, अशा भागात भाजपने पाय रोवण्यास सुरुवात केली आहे. या भागात संघटन विस्तारावर भर दिला आहे.
Devendra Fadnavis ajit pawar.jpg
Devendra Fadnavis ajit pawar.jpgSarkarnama
Published on
Updated on

Pune News : महिनाभर प्रक्रिया करूनही भाजपला दक्षिण पुणे जिल्ह्याचा अर्थात बारामतीचा अध्यक्ष निवडता आलेला नाही. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा जिल्हाध्यक्ष कोण होणार, याची उत्सुकता आणखी ताणली आहे, तर उत्तर पुणे जिल्ह्याचा म्हणजेच मावळचा जिल्हाध्यक्ष निवडताना पक्षातील गटबाजी दिसून आली आहे. भाजपने (BJP) पुणे जिल्ह्यात उत्तर आणि दक्षिण असे दोन विभाग केले असून, दोन जिल्हाध्यक्षांची निवड केली जाते.

उत्तरमध्ये मावळ, खेड, आंबेगाव, जुन्नर, शिरूर-हवेली, तर दक्षिणमध्ये भोर, पुरंदर, बारामती, इंदापूर, दौंड या विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रदीप कंद यांची भाजपकडून मावळ जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली.

केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि आमदार राहुल कुल यांनी कंद यांच्यासाठी सक्रिय भूमिका घेतली होती. दुसरीकडे शरद बुट्टे पाटील यांनीही पुन्हा संधी मिळावी, यासाठी फारसे प्रयत्न केले नाहीत. लोकसभा आणि विधानसभेला तिकीट न मिळाल्याने कंद यांना महामंडळ देण्याचा विचार भाजपच्या वरिष्ठांकडून सुरू होता.

Devendra Fadnavis ajit pawar.jpg
Ratnagiri BJP election : रवींद्र चव्हाणांच्या शब्दाला मान; रत्नागिरीत निकटवर्तीयांना संधी, सावंतांची फेर निवड

तालुका स्तरावर गटबाजी

जिल्ह्यात तालुका स्तरावर सध्या भाजपची गटबाजी स्पष्टपणे दिसून येत आहे. त्यात एकसूत्रीपणा आणण्यासाठी भाजपकडून प्रयत्न सुरू आहेत. पुणे ग्रामीण हा भाग सामाजिक आणि राजकीयदृष्ट्या मिश्र आहे. शहरी छायेखालचा ग्रामीण पट्टा, जिथे अजूनही जातीय समिकरणे, पारंपरिक वर्चस्व आणि स्थानिक प्रभावशाली नेत्यांचे वजन ठरवणारे घटक आहेत. त्यातच शहरी भागालगतचा जिल्हाध्यक्ष भाजपने निवडला आहे.

काय आहे तांत्रिक कारण ?

जुलै २०२३ मध्ये मावळ (Maval) जिल्हाध्यक्षपदी शरद बुट्टे पाटील आणि बारामतीच्या जिल्हाध्यक्षपदी वासुदेव काळे या दोघांची निवड केली होती. मात्र आज केवळ मावळच्या अध्यक्षाची निवड झाली असून, बारामतीला प्रतीक्षेत ठेवण्यात आले आहे. काही तांत्रिक कारणांमुळे निवड जाहीर करण्यात आली नसून, पुढील काही दिवसांत जाहीर होणार असल्याचे पक्षाकडून सांगण्यात आले.

Devendra Fadnavis ajit pawar.jpg
MVA political news : मोठी बातमी ! महाविकास आघाडीत राजकारण फिरले; उद्धव ठाकरेंचा आमदार शरद पवारांच्या गाडीत

गेल्या काही निवडणुकांमध्ये जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व राहिले आहे. मात्र, पक्षफुटीमुळे स्थानिक राजकारणात बदल होताना दिसत आहेत. ज्या भागामध्ये दोन्ही राष्ट्रवादीमुळे भाजपला शिरकाव करण्याची संधी निर्माण झाली, अशा भागात भाजपने पाय रोवण्यास सुरुवात केली आहे. या भागात संघटन विस्तारावर भर दिला आहे.

भाजपच्या ध्येयधोरणांनुसार सर्वसामान्य नागरिक केंद्रबिंदू मानून केंद्र व राज्य सरकारच्या तळागाळापर्यंत पोहोचविणार आहे. तसेच ग्रामीण भागातील जनतेचे प्रश्न सोडवण्याचा व त्या माध्यमातून निष्ठावंत कार्यकर्त्यांचे प्रभावी संघटन निर्माण करून पक्ष संघटना अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न आहे. - प्रदीप कंद, जिल्हाध्यक्ष

Devendra Fadnavis ajit pawar.jpg
Devendra Fadnavis booster : फडणवीसांच्या मनातील 'बुस्टर' कोण? पवार-पाटील की ठाकरे?

राजकीय कारकीर्द

■ २०१२ : पेरणे वाडेबोल्हाई जिल्हा परिषद गटातून निवडणुकीत विजय २०१२-१४ : जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष म्हणून काम

■ २०१४-१७ : जिल्हा परिषदेचे अध्यक्ष म्हणून काम पाहिले

■ २०१९ : भाजपमध्ये पक्ष प्रवेश

■ पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com