परदेशातून आलेल्यांना ७ दिवसांचे सक्तीचे संस्थात्मक विलगीकरण

तर परराज्यातून येणाऱ्या प्रवाशांनी RT-PCR चाचणीचे रिपोर्च घेऊनच यावे
Ourantine/ Omicron Variant
Ourantine/ Omicron Variant
Published on
Updated on

मुंबई : कोरोना विषाणूच्या (Corona virus) नव्या ओमिक्रॉन व्हेरीयंटच्या (Omicron Variant) संसर्गाने महाराष्ट्राची (Maharashtra) चिंताही वाढवली आहे. कोरोनाच्या मागील दोन लाटांचा कहर पाहता राज्य सरकारने प्रतिबंधात्मक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार परदेशातून येणाऱ्या प्रवाशांना आता सक्तीच्या ७ दिवसांच्या संस्थात्मक विलगीकरणात (Qurantine) राहावे लागणार आहे. राज्य सरकारने याबाबत नुकतेच आदेश जारी केले आहेत.

महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने दिलेल्या आदेशानुसार, उच्च जोखीम असलेल्या देशांतून येणाऱ्या प्रवाशांना सरकारने ठरवलेल्या ठिकाणी सात दिवस अनिवार्यपणे विलगीकरणात राहावे लागणार आहे. एवढेच नाही तर इतर राज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांसाठीही आरटी-पीसीआर अहवाल अनिवार्य करण्यात आला आहे. त्यांनी दोन्ही लसी घेतल्या असल्या तरी त्यांना RT-PCR अहवालाशिवाय राज्यात प्रवेश दिला जाणार नाही.

Ourantine/ Omicron Variant
शरद पवारांना भेटण्यापूर्वीच ममता बॅनर्जींना मोठा झटका

महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार-

- या देशांतून येणाऱ्या प्रवाशांचे राज्यात आगमन झाल्यानंतर दुसऱ्या, चौथ्या आणि सातव्या दिवशी RT-PCR चाचणीही केली जाईल.

- जर एखाद्या प्रवाशाला संसर्ग झाल्याचे आढळले तर त्याला रुग्णालयात दाखल केले जाईल. त्याचा रिपोर्ट निगेटिव्ह आला तरी त्याला सात दिवस घरातच आयसोलेशनमध्ये राहावं लागणार आहे.

- राज्य सरकारच्या आदेशानुसार, 28 नोव्हेंबर रोजी केंद्राने जारी केलेली प्रवासी मार्गदर्शक तत्त्वे नवीन कोविड प्रकार 'ओमिक्रॉन' पाहता "किमान निर्बंध" म्हणून कार्य करतील, ज्याला व्हेरिएंट ऑफ कन्सर्न असे नाव देण्यात आले आहे.

- नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार, राज्यात प्रवास करणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांना त्यांनी गेल्या 15 दिवसांत भेट दिलेल्या देशांची माहिती द्यावी लागेल. आगमन झाल्यावर इमिग्रेशनद्वारे त्यांची उलटतपासणी केली जाईल. चुकीची माहिती दिल्यास प्रवाशांवर आपत्ती व्यवस्थापन कायदा, 2005 च्या कलमांनुसार कारवाई केली जाईल.

-"जोखीम" मानल्या गेलेल्या देशांच्या यादीमध्ये आता यूके, युरोपमधील सर्व 44 देश, दक्षिण आफ्रिका, ब्राझील, बांगलादेश, बोत्सवाना, चीन, मॉरिशस, न्यूझीलंड, झिम्बाब्वे, सिंगापूर, हाँगकाँग आणि इस्रायल यांचा समावेश आहे.

जोखीम असलेला देश वगळता इतर कोणत्याही देशांतील प्रवाशांना विमानतळावर RT-PCR चाचणी अनिवार्यपणे करावी लागेल आणि निगेटिव्ह आल्यावर त्यांना १४ दिवस होम क्वारंटाईन करावे लागेल. पॉझिटिव्ह आढळल्यास त्यांना रुग्णालयात हलवण्यात येईल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com