Prakash Ambedkar Big Statement : ''...त्यामुळे महाराष्ट्रातील दंगली थांबल्या !''; आंबेडकरांचं खळबळजनक विधान

Maharashtra Politics : '' संभाजीराजेंच्या हत्येत हिंदू...''
Prakash Ambedkar
Prakash AmbedkarSarkarnama
Published on
Updated on

Prakash Ambedkar News : वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर हे गेल्या आठवड्यात छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी खुलताबादला भेट देत औरंगजेबाच्या कबरीवर फुलं वाहून माथा टेकला होता. त्यानंतर भद्रा मारूतीचं मंदिरात जाऊन दर्शनही घेतलं होतं. मात्र, आंबेडकर यांनी औरंगजेबाच्या कबरीवर फुलं वाहिल्यानं त्यावरून भाजप आणि शिंदे गटाकडून तीव्र प्रतिक्रिया देण्यात आल्या. तसेच संभाजीराजे यांनी देखील आंबेडकरांवर टीका केली होती. आता प्रकाश आंबेडकर यांनी मोठा दावा करत खळबळ उडवून दिली आहे.

प्रकाश आंबेडकर(Prakash Ambedkar) यांनी दिल्लीत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी खूप मोठा दावा केला आहे. आपण औरंगजेबाच्या समाधीस्थळी जावून भेट दिली. त्यामुळे महाराष्ट्रातील दंगली थांबवण्यात आपल्याला यश आलं असं खळबळजनक विधान आंबेडकर यांनी केलं आहे. मी औरंगजेबाच्या कबरीवर फुलं वाहिली, माझ्या निर्णयामुळे राज्यातील दंगली थांबल्या. अनेकजण कबरीवर गेले आहेत. याचवेळी संभाजीराजेंना जी शिक्षा झाली त्याची मी निंदा करतो अशी भूमिका प्रकाश आंबेडकर यांनी मांडली.

Prakash Ambedkar
Prakash Ambedkar News: 'संभाजी महाराजांना औरंगजेबाच्या हाती देण्यासाठी कुणी मदत केली? आंबेडकरांचा सवाल

आंबेडकर काय म्हणाले ?

प्रकाश आंबेडकर यांनी संभाजीराजे यांच्या हत्येत हिंदू सहभागी होतं असं खळबळजनक दावा केला आहे. यामुळे राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. आंबेडकर म्हणाले, संभाजीराजे संगमेश्वरला का गेले? यावर वाद आहे. त्यांची माहिती औरंगजेबपर्यंत कशी पोचली? जयचंदमुळे गेले, असा इतिहास आहे. औरंगजेबाने जो दंड दिला त्याची आम्ही निंदा करतो. गणोजी शिर्के, रामनाथ स्वामी यांनी संभाजीराजे संगमेश्वरला असल्याची माहिती पोहोचवली असंही आंबेडकर म्हणाले.

संभाजीराजेंच्या हत्येत हिंदू...

तसेच आपण औरंगजेबचा जितका निषेध करतो तितका शिर्के, आबा भटजी यांचाही निषेध करायला हवा. हे वस्तुस्थितीला धरून नाही. हिंदू, मुस्लिम, जैन, हिंदू हा वाद जो देशात होतोय त्याबाबत जो इतिहास दिला जातो तो बरोबर नाही. संभाजीराजे यांच्या हत्येत हिंदू सहभागी होते असं मतही त्यांनी व्यक्त केलं.

Prakash Ambedkar
Solapur NCP : राष्ट्रवादीला महाराष्ट्रात नंबर वन बनविण्यासाठी अजितदादांना प्रदेशाध्यक्ष करा : सोलापूरच्या सरचिटणीसांचे पवारांना पत्र

संभाजीराजेंचा संताप...

संभाजीराजे छत्रपती यांनी वंचित बहुजन आघाडी(Vanchit Bahujan Aaghadi) चे नेते प्रकाश आंबेडकर यांनी औरंगजेबाच्या कबरीला दिलेल्या भेटीवर भाष्य केलं. संभाजीराजे म्हणाले, "ज्याने शिवाजी महाराजांना त्रास दिला, संभाजीराजेंची हत्या केली, त्याचं कुणी कसं कौतुक करू शकते? हे महाराष्ट्राचे संस्कार नाहीत अशा शब्दांत संभाजीराजेंनी आंबेडकरांना खडेबोल सुनावले.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com