Prakash Ambedkar
Prakash AmbedkarSarkarnama

Prakash Ambedkar News: 'संभाजी महाराजांना औरंगजेबाच्या हाती देण्यासाठी कुणी मदत केली? आंबेडकरांचा सवाल

Hindu-Muslim Politics: संभाजीराजे संगमेश्वरला का गेले, त्यांची माहिती औरंगजेबापर्यंत कशी आणि कोणी पोचली
Published on

Prakash Ambedkar on Sambhaji Maharaj : छत्रपती संभाजी महाराजांना मनुस्मृती प्रमाणे शिक्षा देण्यात आली, त्यांच्या हत्येत हिंदू लोकांचाही समावेश होता. असा खळबळजनक दावा वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. आज (२६ जून ) त्यांनी नवी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली, यावेळी ते बोलत होते. ('Who helped Aurangzeb to catch Sambhaji Maharaj? Ambedkar's question)

यावेळी प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येबद्दल मोठं विधान केलं आहे. औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांचे हाल का केले. याचं कारण काय, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. हे प्रश्न उपस्थित करतानाच त्यांनी इतिहासकार जैमिनी कडू यांच्या एका पुस्तकाचाही दाखला दिला आहे.

Prakash Ambedkar
KCR In Maharashtra : संजय राऊतांना 'केसीआर' यांच्या भूमिकेबाबत शंका; म्हणाले, "त्यांची नियत..."

जैमिनी कडू यांच्या पुस्तकाचा संदर्भ देत प्रकाश आंबेडकर म्हणाले,औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांची हत्या केली. पण आपण औरंगजेबचा जितका निषेध करतो तितका गणोजी शिर्के, आबा भटजी यांचाही निषेध करायला हवा. औरंगजेबाच्या सल्लागार मंडळात आबा भटजी नावाचे सल्लागार होते. आबा भटजी यांनीच संभाजी महाराजांना कशी शिक्षा व्हावी, याचा सल्ला औरंगजेबाला दिला होता. असे या पुस्तकात सांगण्यात आले आहे. (Maharashtra Politics)

आबा भटजी यांनी संभाजीराजेंना मनुस्मृतीप्रमाणे शिक्षा देण्यात यावी, असा सल्ला औरंगजेबाला दिला आणि तो अंमलात आणला गेला. असं मी मानतो. फारसी इतिहासातही तसा उल्लेख आहे, असा दावाही प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. भारतीय इतिहासात जे-जे स्वतंत्र राज्य निर्माण करायला निघाले होते. ते उभे करताना जयचंद निर्माण झाले आणि या जयचंदांनी स्वतंत्र राज्य संपवली. (Political News)

Prakash Ambedkar
Nana Patole News : तेलंगणा पॅटर्न हा गुजरात पॅटर्नसारखाच फसवा; लवकरच फोलखोल करणार : पटोलेंचा हल्लाबोल

संभाजीराजे संगमेश्वरला का गेले, त्यांची माहिती औरंगजेबापर्यंत कशी आणि कोणी पोचली, रंगनाथ स्वामी यांनी संभाजी महाराजांची माहिती औरंगजेबाला दिली आणि त्यांना पकडून देण्यात त्याला कोणी मदत केली. कोणी फितुरी केली. ती माहिती देणारे काही मुस्लिम नाहीत. औरंगजेबाने आदिलशाहा, बिजापूरच्या राजालाही मारुन टाकलं, पण संभाजी महाराजांना मारताना त्याने जी क्रुरता केली. ती त्याला कुणी करायला सांगितली. संभाजीराजेंची हत्या केली. पण त्यांना पकडून देणारा आणि त्यांना शिक्षा कशी व्हावी, हे सांगणाऱ्याचा आपण निषेध करत नाही. तेच इथले खरे जयचंद आहेत असे मी मानतो.

Edited By- Anuradha Dhawade

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com