Banks Scam : 'या' 15 जणांनी भारतीय बँकांचा बाजार उठवला... तब्बल 39 हजार कोटी पाण्यात : वाचा सविस्तर यादी

Top 15 People Who Shook the Indian Banking Market : भारतीय बँकिंग मार्केटला हादरा देणाऱ्या 15 जणांची सविस्तर यादी जाणून घ्या. तब्बल 39 हजार कोटींचे नुकसान कसे झाले.
Banks Scam : 'या' 15 जणांनी भारतीय बँकांचा बाजार उठवला... तब्बल 39 हजार कोटी पाण्यात : वाचा सविस्तर यादी
Published on
Updated on

फरार आर्थिक गुन्हेगार कायद्यांतर्गत सरकारने 31 ऑक्टोबरअखेरपर्यंत एकूण 15 जणांना फरारी आर्थिक गुन्हेगार जाहीर केले आहे. त्यात विजय मल्ल्या, नीरव मोदीसह अन्य गुन्हेगारांचा समावेश आहे. या सगळ्यांमुळे देशाला तब्बल 39 हजार कोटी रुपयांचे नुकसान सहन करावे लागत आहे. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी नुकतेच लोकसभेत अतारांकित प्रश्नाच्या उत्तरात ही माहिती दिली.

काँग्रेसचे खासदार मुरारी लाल मीना यांनी उपस्थित केलेल्या अतारांकित प्रश्नात फरार आर्थिक गुन्हेगारांची नावे, त्यांनी फसवणूक केलेल्या प्रकरणांचा तपशील आणि बँकांचे झालेले आर्थिक नुकसान याबद्दलची तसेच भविष्यात आर्थिक गुन्हेगारांना देशाबाहेर पळून जाता येऊ नये यासाठी सरकार कायदेशीर धोरण तयार करत आहे काय, याबाबतची माहिती विचारली होती.

Banks Scam : 'या' 15 जणांनी भारतीय बँकांचा बाजार उठवला... तब्बल 39 हजार कोटी पाण्यात : वाचा सविस्तर यादी
How to Check name voter list... : आता फक्त 2 मिनिटात! असे शोधा मतदार यादीत आपले नाव आहे की नाही?

उत्तरात पंकज चौधरी म्हणाले, या 15 गुन्हेगारांपैकी नऊ जण सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या आर्थिक फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपी आहेत. या यादीत विजय मल्ल्या आणि नीरव मोदी यांच्यासह नितीन संदेसरा, चेतन संदेसरा, दीप्ती संदेसरा, सुदर्शन वेंकटरामन, रामानुजम शेषरत्नम, पुष्पेश कुमार बैद आणि हितेश कुमार नरेंद्रभाई पटेल यांसारख्या अन्य बड्या नावांचाही समावेश आहे.

Banks Scam : 'या' 15 जणांनी भारतीय बँकांचा बाजार उठवला... तब्बल 39 हजार कोटी पाण्यात : वाचा सविस्तर यादी
Pension Scheme : चिंता मिटली! आता दरमहा 10 हजार पेन्शन थेट तुमच्या घरी! योजनेत सामील होण्यासाठी 'स्टेप-बाय-स्टेप' प्रक्रिया

या गुन्हेगारांनी 31 ऑक्टोबर पर्यंत एकत्रितपणे बँकांची 26,645 कोटी रुपयांची मूळ रक्कम बुडवली आहे. शिवाय, 31 ऑक्टोबरपर्यंत कर्ज अनुत्पादक झाल्यामुळे या कर्जांवर व्याज वाढून ती रक्कम 31,437 कोटी रुपये झाली. 31 ऑक्टोबरपर्यंत या गुन्हेगारांकडून 19,187 कोटी रुपये वसूल केले आहेत, असेही अर्थराज्यमंत्र्यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com