Torres Scam : धक्कादायक : टोरेस घोटाळ्यातील आरोपींचे युक्रेन, रशिया, उझबेकिस्तान कनेक्शन समोर; गुंतवणूकदारांची कोट्यवधींची फसवणूक

Mumbai Police three arrest Ponzi Scam : मुंबई पोलिसांनी टोरेस घोटाळा प्रकरणी आतापर्यंत तिघांना अटक केली असून त्यांचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन समोर आले आहे.
Torres Scam
Torres ScamSarkarnama
Published on
Updated on

Mumbai : मुंबई, ठाण्यासह आसपासच्या भागातील लाखो गुंतवणूकदारांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घालणाऱ्या टोरेस कंपनीचे थेट आंतरराष्ट्रीय कनेक्शन समोर आले आहे. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. तर मास्टरमाईंड युक्रेनला पळून गेल्याचे समजते. अटक केलेल्यांमध्य एक जण रशिया तर दुसरा उझबेकिस्तनामधील आहे.

दादरमधील शिवाजी पार्क पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर तीन जणांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी उझबेकिस्तानची रहिवासी असलेली जनरल मॅनेजर तानिया कसातोवा, संचालक सर्वेश अशोक सुर्वे आणि रशियन नागरिक असलेली स्टोअर मॅनेजर व्हॅलेंटिना गणेश कुमार या तिघांना अटक केली आहे.

Torres Scam
Jitendra Awhad : 'वाल्मिक कराड 'विकृत', 'सायकोपॅथ', 'सीरियल किलर''; आमदार आव्हाडांचा बीडमधील दहा वर्षांतल्या हत्यांबाबतच्या दाव्यानं खळबळ

तिघेही दादर कार्यालयातील रक्कम, दागिने घेऊन पळण्याच्या तयारीत असतानाच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. कंपनीचा संस्थापक जॉर्न कार्टर आणि व्हिक्टोरीया कोवालेंको हे दोघेही युक्रेनला पसार झाल्याचे समजते. तेच या घोटाळ्याचे मास्टरमाईंड असल्याचे समजते. मुख्य कार्यकारी अधिकारी असलेला तौफिक रियाज आणि सीए अभिषेक गुप्ता दोघेही भारतात असून, त्यांच्याविरुद्ध लूक आऊट नोटीस जारी करण्यात आली आहे.

नेमका कसा झाला घोटाळा?

टोरेस ज्वेलर्स कंपनीने गुंतवणूकदारांसाठी आकर्षक परताव्याची योजना सुरू केली होती. कंपनीने दादर, गिरगाव, कांदिवली, कल्याण, सानपाडा, मीरा रोड या सहा ठिकाणी शाखा उघडल्या होत्या. सर्वच ठिकाणी लाखो गुंतवणूकदारांनी या योजनेत पैसे गुंतवले होते. काही महिने सुरूवातीला चार टक्के आणि नंतर दहा टक्के परतावा देण्यात आला. पण मागील दोन आठवडे परताना न मिळाल्याने फसणुकीचा प्रकार समोर आला.

Torres Scam
Nagpur Youth Congress : युवक काँग्रेसच्या राष्ट्रीय महासचिवाची राजकीय कारकीर्द धोक्यात? काय आहे प्रकरण!

आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकानेही मंगळवारी या फसवणूक प्रकरणाचा आढावा घेतला. आर्थिक गुन्हे शाखा या प्रकरणाचा तपास करणार आहे. आतापर्यंत याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. सोमवारी टोरेसच्या दुकानांबाहेर गुंतवणूकदारांनी गर्दी करत आपला रोष व्यक्त केला. हा घोटाळा काही हजार कोटींचा असल्याची प्राथमिक माहिती आहे. सुमारे तीन लाख गुंतवणूकदारांची फसवणूक झाल्याची चर्चा आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com