Rashmi Shukla : मोठी बातमी : पोलिस महासंचालक रश्मी शुक्लांना पदावरून हटवले; निवडणूक आयोगाकडून झटका

Election Commission action Rashmi Shukla: रश्मी शुक्ला यांना पदावरून हटवण्याची मागणी महाविकास आघाडीने निवडणूक आयोगाकडे केली होती.
Rashmi Shukla
Rashmi ShuklaSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News: राज्यातील विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच राज्याच्या पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांना पदावरून हटवण्यात आले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने त्यांची बदली करण्याचा निर्णय घेतला आहे. आयोगाकडून राज्याच्या मुख्य सचिवांना याबाबत कळविण्यात आले आहे.

महाविकास आघाडीने शुक्ला यांना हटवण्याची मागणी निवडणूक आयोगाकडे काही दिवसांपूर्वी केली होती. त्यावेळी आयोगाकडून याबाबत कोणताही निर्णय घेण्यात आला नव्हता. सोमवारी मात्र आयोगाने शुक्ला यांना हटविल्याचा आदेश मुख्य सचिवांच्या कार्यालयात धडकला. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोगाने हा सर्वात मोठा निर्णय घेतला आहे.

Rashmi Shukla
Manoj Jarange Patil : कुणाला निवडून आणायचं, कुणाला पाडायचं? मनोज जरांगेंनी पक्कं केलं...

रश्मी शुक्ला पदावर असल्याचे निवडणूक प्रक्रिया पारदर्शकपणे पार पडणार नाही, असा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केला होता. यापार्श्वभूमीवर शुक्ला यांची करण्यात आलेली बदली महत्वाची मानली जात आहे.

दरम्यान, निवडणूक आय़ोगाने मुख्य सचिवांना दिलेल्या आदेशात शुक्ला यांची जागी त्यांच्यानंतरच्या वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांकडे तात्पुरता पदभार देण्यास सांगितले आहे. तसेच तीन अधिकाऱ्यांची नावे मंगळवारी दुपारी एक वाजेपर्यंत आयोगाकडे पाठवण्याचे आदेशही आयोगाने दिले आहेत.

Rashmi Shukla
Manoj jarange Patil: जरांगे म्हणाले ना, मात्र इरेला पेटलेले समर्थक ठाम; `या` मतदारसंघात उमेदवार देणारच!

2019 च्या विधानसभा निवडणुकीदरम्यान तसेच सत्ता स्थापनेच्या शुक्ला यांनी आपले फोन टॅपिंग केल्याचा आरोप महाविकास आघाडीतील नेत्यांनी केला होता. आघाडीची सत्ता आल्यानंतर शुक्ला यांना हटवण्यात आले होते. महायुतीची सत्ता आल्यानंतर शुक्ला यांना राज्याचे पोलिस महासंचालक करण्यात आले होते. काही महिन्यांपूर्वीच त्यांची मुदत संपली आहे. त्यानंतर त्यांना मुदतवाढ देण्याचा निर्णय सरकारने घेतला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com