Phaltan Doctor suicide case twist : डॉक्टर युवती आत्महत्या प्रकरणात ट्विस्ट : हातावरील अक्षर अन् धनंजय मुंडेंच्या दाव्याने तपासाची सगळी दिशाच फिरणार

Phaltan crime news : फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टर आत्महत्येच्या घटनेत आता रोज नवनवीन खुलासे होत आहेत. त्यातच आता या प्रकरणात मोठे ट्विस्ट आले आहे.
Satara Doctor Case
Satara Doctor Case sarkarnama
Published on
Updated on

Satara News : सातारा जिल्ह्यातील फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरने आत्महत्या केल्यानंतर राज्यात खळबळ उडाली आहे. आत्महत्येच्या या घटनेत आता रोज नवनवीन खुलासे होत आहेत. त्यातच आता या प्रकरणात मोठे ट्विस्ट आले आहे. मृत महिला डॉक्टरच्या बहिणीच्या मते, हे हस्ताक्षर तिचे नाही आहे. त्यामुळे पोलिसांनी या सर्व प्रकरणाची चौकशी केली पाहिजे, सर्वांचे सीडीआर काढले पाहिजेत, अशी मागणी माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी केली आहे. त्यामुळे आता तळहातावरील अक्षर कोणाचे? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

फलटणमध्ये एका महिला डॉक्टरने आत्महत्या केल्याचा प्रकार शुक्रवारी उघडकीस आला होता. या डॉक्टरने हॉटेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली होती. दरम्यान मृत्यूपूर्वी या महिला डॉक्टरने तळहातावर एक सुसाईड नोट लिहिली होती, त्या सुसाईड नोटमध्ये तिने पीएसआय गोपाळ बदने आणि प्रशांत बनकर यांच्यावर गंभीर आरोप केले होते. गोपाळ बदने याने लैंगिक अत्याचार केल्याचे या सुसाईड नोटमध्ये म्हटले आहे, तर प्रशांत बनकर यांनी शारीरीक आणि मानसिक छळ करत होता असाही आरोप या सुसाईड नोटमध्ये करण्यात आला आहे. त्यानंतर या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी गंभीर आरोप केले आहेत.

Satara Doctor Case
CM Fadnavis announcement : महिला डाॅक्टर आत्महत्या प्रकरणात फलटणमधून CM फडणवीसांची मोठी घोषणा अन् माजी खासदार निंबाळकरांना क्लिन चिट

या ठिकाणच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून हा प्रकार घडलेला आहे. कुटुंबातला एकही व्यक्ती मानायला तयार नाही की या महिला डॉक्टरने आत्महत्या केली आहे म्हणून, घरच्यांना असे वाटत आहे की ही आत्महत्या घडवून आणली गेली आहे, त्याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी धनंजय मुंडे यांनी केली आहे. याबाबत मी सीएम फडणवीस यांना सांगितले आहे. या प्रकरणात एसआयटी नेमावी, आणि या एसआयटीमध्ये सिनियर महिला आयपीएस अधिकारी नियुक्त कराव्यात,अशी मागणी केली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Satara Doctor Case
Rajan Patil BJP Entry : राजन पाटलांच्या भाजप प्रवेशावर राष्ट्रवादी नेत्याचे मोठे भाष्य; ‘तुम्हाला पक्षाने भरपूर दिलंय; त्यामुळे हे उचित नाही’

या प्रकरणी मृत महिला डॉक्टरच्या बहिणीने हे हस्ताक्षर तिचे नसल्याचा दावा केला आहे. त्यामुळे आता या प्रकरणात मोठा ट्विस्ट पाहवयास मिळत आहे. पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली पाहिजे. या प्रकरणात एसआयटी नेमून चौकशी केली पाहिजे, असेही धनंजय मुंडे म्हणाले.

Satara Doctor Case
Ravindra Dhangekar News: जैन बोर्डिंगच्या जागेचा वाद 'दिल्ली दरबारी'; PM मोदींना पत्र पाठवत धंगेकरांची सर्वात मोठी घोषणा

दरम्यान, या प्रकरणातील दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात आरोपी असलेल्या निलंबित पीएसआय गोपाल बदनेला रविवारी सायंकाळी फलटण न्यायालयात हजर केले. त्यानंतर कोर्टाने 30 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. तर दुसरा आरोपी प्रशांत बनकरला कोर्टाने यापूर्वीच 28 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. प्रशांत बनकरवर शारीरिक व मानसिक छळ केल्याचा आरोप आहे.

Satara Doctor Case
Ajit Pawar News : ओ दादा, कर्जमुक्तीवर बोला.. नांदेडच्या सभेत शेतकऱ्याची आरोळी! अजित पवार म्हणाले, आम्ही शब्दाचे पक्के

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com