Ajit Pawar News : ओ दादा, कर्जमुक्तीवर बोला.. नांदेडच्या सभेत शेतकऱ्याची आरोळी! अजित पवार म्हणाले, आम्ही शब्दाचे पक्के

Ajit Pawar On Farmers Loan Waiver : केंद्रातील सरकारने सत्तर हजार कोटींची कर्जमाफी केली, त्यानंतर राज्यातील तत्कालीन सरकारांनी दोनवेळा कर्जमाफी केली, आता शेतकऱ्यांसाठी 32 हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले आहे.
Ajit Pawar In Marathwada-Nanded District NCP News
Ajit Pawar In Marathwada-Nanded District NCP NewsSarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. नांदेडच्या सभेत तरुण शेतकऱ्याने “कर्जमुक्तीवर बोला” अशी मागणी केल्यानंतर अजित पवारांनी सरकारच्या कर्जमाफीच्या आकडेवारीचा उल्लेख केला.

  2. पवारांनी सांगितले की, आतापर्यंत लाखो शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला असून शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे.

  3. सभेत झालेल्या या संवादाची चर्चा सोशल मीडियावर जोरात सुरू आहे.

NCP News : नांदेड जिल्ह्यातील देगलूर-उमरी तालुक्यात पक्षप्रवेश सोहळ्यासाठी आलेले राज्याचे उपमुख्यंमत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या सभेतील एका प्रकाराची चर्चा होत आहे. अजित पवारांच्या सभेत उपस्थितांमधून विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांना ते मिश्किलपणे तर कधी टोले लगावत उत्तर देत असतात. यातून अजित पवारांचा हजरजबाबीपणाही दिसतो. नांदेडमध्ये भाषण सुरू असताना एका लांब उभ्या असलेल्या शेतकऱ्याने 'ओ दादा शेतकरी कर्जमुक्तीवर बोला की' म्हणत आरोळी ठोकली.

या आवाजाकडे लक्ष जाताच अजित पवारांनी 'ए बाळा थांब, जरा ऐक' म्हणत आतापर्यंत केलेल्या शेतकरी कर्जमाफीची आकडेवारीच सांगीतली. केंद्रातील सरकारने सत्तर हजार कोटींची कर्जमाफी केली, त्यानंतर राज्यातील तत्कालीन सरकारांनी दोनवेळा कर्जमाफी केली, आता शेतकऱ्यांसाठी 32 हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले आहे, याकडे अजित पवारांनी लक्ष वेधले.

आज नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता मेळावा पार पडला. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार व इतर पक्षातील प्रमुख पदाधिकारी, माजी नगराध्यक्ष, अनेक माजी नगरसेवक आणि असंख्य कार्यकर्त्यांनी पक्षात जाहीर प्रवेश केला. या मेळाव्यात बोलताना अजित पवारांनी सर्वांचं मनापासून स्वागत केलं, पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आणि पक्षाची विचारधारा समजावून सांगितली.

Ajit Pawar In Marathwada-Nanded District NCP News
NCP News : निष्ठावंतांनाच उमेदवारी द्या; राष्ट्रवादीच्या बैठकीत उण्या-दुण्याने सुरवात, पण शेवट गोड!

देगलूरची भूमी ही मराठवाड्याची पंढरी म्हणून प्रसिद्ध आहे. या भूमीत हिंदू-मुस्लिम ऐक्याची परंपरा ही सातत्यानं जपली गेलेली आहे. शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांच्या बळावर आम्ही सगळ्यांना सोबत पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करत आहोत. आम्ही बेरजेचं राजकारण करतोय. समाजा-समाजात, धर्म-प्रांतात द्वेष बाळगून आपण पुढे जाऊ शकत नाही, विकास होऊ शकत नाही. याउलट जातीय सलोखा ठेवणं हे तुमचं माझं कर्तव्य आहे. देगलूरकरांनी नेहमीच या विचारांना जपलेलं आहे.

Ajit Pawar In Marathwada-Nanded District NCP News
Mahayuti ministers audit: फडणवीसांसह शिंदे, अजितदादा अ‍ॅक्शन मोडवर; महायुतीच्या मंत्र्यांची धडधड वाढली; 'स्थानिक'च्या निवडणुकीआधीच मोठा निर्णय होणार!

आगामी काळात जिल्हा परिषद, तालुका पंचायत, नगरपालिका, महानगरपालिकांच्या निवडणुका आहेत. त्या पार्श्वभूमीवर सर्वांनी कसून कामाला लागलं पाहिजे. अतिवृष्टीमुळे बळीराजाचं मोठं नुकसान झालेलं आहे. त्याला पुन्हा उभं करण्यासाठी आपल्या सरकारनं 32 हजार कोटींची आर्थिक मदत देऊ केली आहे. या मेळाव्याच्या निमित्तानं जी निवेदनं माझ्यापर्यंत पोहोचली आहेत, त्यांची दखल घेऊन आवश्यक त्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देऊन कामं मार्गी लावली जातील.

आम्ही शब्दाचे पक्के आहोत, दिलेला शब्द पाळणारे लोक आहोत, त्यामुळे निश्चिंत रहा, असा विश्वास अजित पवारांनी यावेळी दिला. मराठवाडा, विदर्भ, कोकण, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र अशा पद्धतीनं सगळीकडे विकास पोहोचवून संपूर्ण महाराष्ट्र पुढे गेला पाहिजे, हीच आमची भूमिका आहे. विकासासाठी निधी कुठे कमी पडू देणार नाही, अशी खात्री देतानाच नांदेड जिल्हा राष्ट्रवादीमय करण्यासाठी संकल्प करण्याचे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.

FAQs

1. नांदेडच्या सभेत नेमकं काय घडलं?
तरुण शेतकऱ्याने अजित पवारांना कर्जमुक्तीबाबत प्रश्न विचारला आणि त्यावर पवारांनी आकडेवारीसह उत्तर दिलं.

2. अजित पवारांनी कर्जमाफीबाबत काय सांगितलं?
त्यांनी सांगितलं की, आतापर्यंत राज्यातील लाखो शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्यात आला आहे.

3. शेतकऱ्याच्या प्रश्नावर सभेत कशी प्रतिक्रिया मिळाली?
सभेत उपस्थित जनतेने टाळ्यांचा कडकडाट करून शेतकऱ्याच्या धैर्याचं स्वागत केलं.

4. हा मुद्दा सोशल मीडियावर का चर्चेत आला?
कारण शेतकऱ्याने थेट प्रश्न विचारल्याने आणि अजित पवारांनी तत्काळ उत्तर दिल्याने हा संवाद व्हायरल झाला.

5. सरकारच्या नवीन कर्जमाफी योजनेबद्दल काही घोषणा झाल्या का?
सभेत नवीन घोषणा नाही, परंतु चालू योजनांची माहिती देण्यात आली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com