firing case : दोन महिन्यांपूर्वी बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद पोलिस ठाण्याच्या हद्दीत वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांच्या कारवर गोळीबार करत हल्ला झाला होता. तशी तक्रार जळगाव जामोद ठाण्यात देण्यात आली होती. मात्र, पोलिस तपासात जे समोर आले त्यामुळे सारेच चक्रावून गेले.
गाडीवर हल्ला झाला म्हणून तक्रार देणाचे वंचितचे पदाधिकारी प्रकाश भिसे आणि त्यांच्यासोबत असणारे सुनील बोदडे यांनाच पोलिसांनी सोमवारी (ता.9) अटक केली. जामीनावर दोघांचीही सुटका करण्यात आली आहे.
वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी प्रकाश भिसे यांनी जळगाव जामोदी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनुसार 25 जूनला रात्री भिसे आणि पक्षाचे अन्य एक पदाधिकारी सुनील बोदडे हे दोघे कारने नांदुऱ्यावरून परत येत होते.
मार्गात जळगाव जामोदी मतदारसंघातील खांडवी आणि आसलगावच्या दरम्यान अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्या गाडीच्या समोरील काचावर लोखंडी रॉडने हल्ला केला व गोळीबार केला.
पोलिसांनी भिसे यांच्या तक्रारीवरून अज्ञात हल्लेखोरांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता . पोलिसांना तपासात सीसीटीव्ही फुटेज, फिर्यादींच्या मोबाईलचे सीडीआर सर्व संशयास्पद असल्याचे आढळून आले. गाडीच्या काचेवर आढळलेले जिवंत काडतुस फॉरेन्सिक तपासणीत गोळीबार झाला नसल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे प्रकाश भिसे आणि सुनील बोदडे यांनी पोलिसांची दिशाभूल केल्याचे दिसून आले.
राजकीय प्रसिद्धीसाठी, आगामी विधानसभा निवडणुकीत 'वंचित'कडून उमेदवारी मिळावी, यासाठी दोन महिन्यांपूर्वी हा बनाव रचण्यात आल्याचेही पोलिस तपासात आढळून आले. या प्रकरणी पोलिसांनी गोळीबार झाल्याचा खोटा बनाव केल्याचा गुन्हा दाखल करत प्रकाश भिसे आणि सुनील बोदडे यांना अटक केली होती. न्यायालयाने जामीनावर दोघांची सुटका केली.
(Edited By Roshan More)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.