
Uday Samant News : उदय सामंतांच्या सोबत 20 आमदार असून त्यांना शिंदेपासून भाजप फोडणार असल्याचा दावा, संजय राऊत, विजय वडेट्टीवार यांनी केला होता. मात्र, या दाव्यात तथ्य नसल्याचे उदय सामंत यांनी दावोसमधून परत आल्यानंतर पुन्हा एकदा सांगित विरोधी पक्षातील मोठा नेता भाजपमध्ये जाणार असल्याचा गौप्यस्फोट त्यांनी केला.
उदय सामंत म्हणाले, माझ्यावर टीका करणाऱ्या विरोधी पक्षातील नेत्याने 10 तासांपूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना फोन केला होता. हा नेता कोण याचे नाव मी घेणार नाही. ठाकरे गटालाही खिंडार पडणार असून त्यांचे चार आमदार आणि तीन खासदार एकनाथ शिंदेसोबत येणार आहेत.
उदय सामंत यांनी उल्लेख केलेला तो विरोधी पक्षातील नेता कोण याची चर्चा सुरू झाली आहे. सामंत यांनी जी हिंट दिली आहे त्याप्रमाणे त्यांच्यावर संजय राऊत, विजय वडेट्टीवार आणि अंबादास दानवे यांनी टीका केली होती. त्यामुळे विजय वडेट्टीवार किंवा अंबादास दानवे यांनी फडणवीस यांना फोन केला का? याची चर्चा सुरू झाली आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न देण्याची मागणी केली.संजय राऊत यांच्या मागणीला उदय सामंत यांनी पाठींबा दिला आहे. सामंत म्हणाले आमचा त्यांच्या पक्षाला पाठींबा नाही मात्र बाळासाहेब ठाकरेविषयी कोणी मागणी करत असेल तर आम्ही त्याला पाठींबा देऊ.
ठाकरेंचा पक्ष फूटणार असून 10 माजी आमदार देखील एकनाथ शिंदे यांच्यासोबत येणार असून काँग्रेसचे पाच आमदार देखील शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे उदय सामंत म्हणाले. तसेच उद्धव ठाकरेंनी त्यांच्या पक्षातील आमदार खासदार एकनाथ शिंदेंसोबत येणार आहेत हिम्मत असेल तर त्यांना रोखून दाखव असे आवाहन देखील सामंत यांनी ठाकरेंना दिले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.