Mumbai News : मुंबईतील बीकेसी मैदानावर गुरुवारी महाविकास आघाडीच्या प्रचाराच्या समारोपाची सभा पार पडली. यावेळी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी २६ मिनिटांच्या घणाघाती भाषणातून जोरदार टीका करताना केंद्र व राज्य सरकारच्या कारभाराची लक्तरे वेशीला टांगली. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा भाषणातून तब्बल ४२ वेळा उल्लेख करताना तिरकसपणे टीका केली. यावेळी त्यांनी संपूर्ण भाषणातून मोदी यांना लक्ष्य केल्याचे जाणवले.
येथील भाषणाची सुरुवात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी जमलेल्या माझ्या देशभक्त बांधवानो, असे म्हणत केली. ठाकरे यांनी त्यांच्या आवेशपूर्ण भाषणात मोदींजी (Narendra Modi) या शब्दाचा उल्लेख सर्वाधिक 42 वेळा केला तर पंतप्रधान या शब्दाचा उल्लेख त्यांनी 13 वेळा केला. त्याशिवाय नरेंद्र मोदी असा संपूर्ण नावाचा उल्लेख त्यांनी नऊ वेळा केला. (Uddhav Thackeray News)
त्याशिवाय या भाषणावेळी ठाकरेंनी हुकूमशहा या शब्दाचा उल्लेख 8 वेळा करीत ते करीत असलेल्या कारभारावर टीका केली. त्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या नावाचा उल्लेख त्यांनी 6 वेळा केला. त्याशिवाय डी मोदी नेशन या शब्दाचा उल्लेख त्यांनी दोन वेळा केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशिवाय या भाषणातून ठाकरेंनी भाजप पक्षाच्या नावाचा उल्लेख 5वेळा केला तर गद्दार या शब्दाचा उल्ल्लेख 5 वेळा केला. त्यासोबतच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शब्द दोनवेळा उच्चरला तर तर मिंधे असा उल्लेख त्यांनी दोनवेळा केला.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
त्यानंतर भाषणाच्या शेवटी प्रमोद महाजन यांच्या नावाचा उल्लेख त्यांनी 4 वेळा केला तर खासदार पूनम महाजन यांच्या नावाचा उल्लेख त्यांनी 3 वेळा केला.
उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या भाषणातून मनसे प्रमुख राज ठाकरे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा उल्लेख एकदाही केला नाही. संपूर्ण भाषणातून त्यांनी पीएम नरेंद्र मोदी यांना टार्गेट केल्याचे दिसून आले.