
Nashik Shivsena News : मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने एकमेकांना राजकीय सहकार्याची टाळी देण्यासाठी एक पाऊल पुढे टाकले आहे. राज्याच्या राजकारणात नवी समीकरणे जुळण्याची चिन्ह आहेत. त्यामुळे नाशिकच्या समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. यासंदर्भात शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या माजी नगरसेविका किरण गामणे आणि त्यांच्या समर्थकांनी शहरात विविध ठिकाणी बॅनर लावले आहे.
आम्ही पक्षाशी एकनिष्ठ आहोत. अनेक दबाव आणि अमिष आले तरी डगमगलो नाही. आगामी काळात उद्धव ठाकरे यांचे हात बळकट करण्यासाठी सज्ज आहोत, असे या बॅनर्सवर म्हटले आहे. तसेच तुम्हीच राज ठाकरेंना मातोश्रीचे निमंत्रण देत महाराष्ट्राला आनंदाची बातमी द्यावी, असे आवाहन या समर्थकांनी उद्धव ठाकरेंना केले आहे.
बॅनर लावणाऱ्या कार्यकर्त्यांनी शहरात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याचे चर्चेने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह असल्याचे म्हटले आहे. यासंदर्भात कोणतेही आढेवेढे न घेता आणि मोठ्या मनाने राज ठाकरे यांना मातोश्रीवर येण्याचे आमंत्रण द्यावे, अशी मागणी या कार्यकर्त्यांनी केली आहे. त्यांनी लावलेले फलक आणि त्यांची मागणी दोन्हीही सध्या चर्चेचे विषय आहेत.
दोन दिवसांपूर्वी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना मैत्रीचा संदेश दिला होता. त्यावर उद्धव ठाकरे यांनीही आपली व्यक्तिगत भांडणे महाराष्ट्राच्या हितापेक्षा मोठी नाहीत असे म्हटले होते. नंतर राज ठाकरे यांच्याशी मैत्रीचा हात पुढे करण्याचा संदेश त्यांनीही दिला होता. मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे दोन्ही पक्ष अर्थात दोन्ही भाऊ एकत्र आल्यास राज्याच्या राजकारणात तो चर्चेचा विषय ठरेल.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही या घटनेचे स्वागत केले होते. काँग्रेससह अन्य पक्षांनीही ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या प्रक्रियेचं स्वागत केलेले आहे. आता ठाकरेंच्या शिवसेनेतूनही त्याचे स्वागत होत आहे. नाशिकमधील माजी नगरसेविका किरण गामणे आणि उपशहरप्रमुख बाळा दराडे यांनी शहरात बॅनर लावले आहे.
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यास महायुतीच्या घटक पक्षांना मात्र अस्वस्थ होणे स्वाभाविक आहे विशेषतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपणच खरी शिवसेना असा दावा करीत आले आहे. सेना उद्धव ठाकरे पक्षाच्या नेत्यांना आपल्याकडे वळविण्यासाठी त्यांनी अनेक प्रयोग आणि प्रकार केले आहेत.
ते सर्वश्रुत असल्याने उपमुख्यमंत्री शिंदे हे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्याच्या प्रक्रियेने त्रस्त आहेत. त्यामुळे हा चर्चेचा विषय आहे. नाशिकमध्ये त्यावर मनसे आणि शिवसेना दोन्ही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे. त्यामुळे आगामी काळात काय होते याची सगळ्यांनाच उत्सुकता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.