Pawar Vs Thopte : संग्राम थोपटेंनी पक्ष बदलला, अजितदादांनी एका वाक्यात विषय संपवला; म्हणाले, ' मी काय...'

Ajit Pawar on Sangram Thopte Joins BJP : संग्राम थोपटे मंगळवारी भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यांच्या प्रवेशामुळे भोर मुळशीमध्ये भाजपचा शिरकाव होणार आहे.
Ajit Pawar, Sangram Thopte, Devendra Fadnavis
Ajit Pawar, Sangram Thopte, Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Ajit Pawar News : भोर-मुळशी-राजगड मतदारसंघाचे काँग्रेसचे माजी आमदार संग्राम थोपटे यांनी आपल्या पक्षाचा राजीनामा दिला आहे. ते उद्या (मंगळवारी) भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यांच्या प्रवेशामुळे भोर मुळशीमध्ये भाजपचा शिरकाव होणार आहे. येथे विद्यमान आमदार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे शंकर मांडेकर हे आहेत. त्यामुळे थोपटेंच्या भाजप प्रवेशाविषयी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्रकारांनी विचारले असता त्यांनी 'मग मी काय करू', असे म्हणत विषय संपवला.

अजित पवार म्हणाले, ते एका राजकीय पक्षाचे आमदार होते. ते आता पराभूत झाले आहेत. आता त्यांनी काय करावे हा त्यांचा अधिकार आहे. त्यावर मी कमेंट करण्याची काहीच कारण नाही.'

15 दिवसांत शरद पवारांसोबत तिसऱ्यांदा भेट झाल्याबद्दल अजित पवारांना विचारले असता ते म्हणाले, साखरपुड्याच्या कार्यक्रमात आम्ही परिवार म्हणून एकत्र आलो होतो. ती महाराष्ट्राची संस्कृती, परंपरा आहे ती वर्षानुवर्ष चालत आली आहे. त्याच्यात बाकीच्यांनी फार काही चर्चा करण्याची गरज नाही. तो पवार परिवाराचा अंतर्गत प्रश्न आहे. दुसरा म्हणजे पवारसाहेब हे ज्या संस्थेचे अध्यक्ष आहे तेथे मी सदस्य, ट्रस्टी म्हणून काम करतो. तेथे मी उपमुख्यमंत्री म्हणून जात नाही मी सदस्य म्हणून जातो.'

Ajit Pawar, Sangram Thopte, Devendra Fadnavis
Ashwini Bidre Case : अश्विनी बिद्रे हत्याप्रकरणी मोठी बातमी; अभय कुरुंदकरला जन्मठेप, फळणीकर, भंडारी सुटणार

थोपटेंनी काँग्रेस सोडण्याचे सांगितले कारण

संग्राम थोपटेंनी रविवारी काँग्रेस सोडण्याचे कारण सांगितले. ते म्हणाले कार्याध्यक्ष, विरोधी पक्षनेता म्हणून संधी मिळायला हवी होती मात्र ती मिळाली नाही. पक्षाकडून सतत डावलण्यात आले. त्यामुळे भाजपमध्येसंधी मिळेल, अशी अपेक्षा कार्यकर्त्यांकडून व्यक्त करण्यात आली त्यामुळे भाजपमध्ये जात आहे.

राष्ट्रवादीला भाजपचे आव्हान

संग्राम थोपटे यांच्या भाजप प्रवेशाने भोर-मुळशी मतदारसंघातील समीकरणे बदलणार आहेत. विद्यमान आमदार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे शंकर मांडेकर आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध भाजप असा सामना होईल. संग्राम थोपटे हे भाजपमध्ये गेल्याने त्यांचे लक्ष्य 2029 ची विधानसभा असणार आहे. त्यामुळे आत्तापासूनच मांडेकरांना आव्हान देण्याची शक्यता आहे.

Ajit Pawar, Sangram Thopte, Devendra Fadnavis
Sanjay Raut Controversy : एकनाथ शिंदेंच्या शिलेदारावर संजय राऊतांची जीभ घसरली, म्हणाले, 'तो चु***...'

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com