Uddhav Thackeray News : मोठी बातमी! विधानपरिषदेतून रिटायर्ड झाल्यानंतर 24 तासांच्या आतच 'हे' आमदार पित्यासह ठाकरेंच्या भेटीला, शिंदेंना धक्का?

Shivsena Political News : लोकसभा निवडणुकीत दारुण पराभव स्वीकारावा लागल्याने महायुतीमधील आमदारांत प्रचंड नाराजी दिसत आहे. यामधील काहीजण महाविकास आघाडीमध्ये प्रवेश करतील, अशी चर्चा रंगली आहे.
Uddhav Thackeray, Eknath Shinde
Uddhav Thackeray, Eknath ShindeSarkarnama

Monsoon session : लोकसभा निवडणुकीचा धुरळा बसला असला तरी सत्ताधारी व विरोधक एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करीत असल्याने राज्यातील वातावरण ढवळून निघाले आहे. त्यातच लोकसभा निवडणुकीत दारुण पराभव स्वीकारावा लागल्याने महायुतीमधील आमदारांत प्रचंड नाराजी दिसत आहे. यामधील काहीजण महाविकास आघाडीमध्ये प्रवेश करतील, अशी चर्चा रंगली आहे.

या पार्श्वभूमीवरच गुरुवारी अजित पवारांच्या गटांतील काही नाराज आमदारांनी शरद पवार गटातील नेते जयंत पाटील यांची भेट घेतल्याची चर्चा दिवसभर विधिमंडळ परिसरात ऐकवयास मिळत होती. त्यातच दुसऱ्या दिवशी एकनाथ शिंदे यांच्याकडील एका माजी आमदाराने उद्धव ठाकरेंची (Uddhav Thackeray) भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे.

विधिमंडळातील अधिवेशनासाठी गुरुवारी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हजेरी लावली. त्यानंतर पहिला दिवस गाजला तो लिफ्टमधील देवेंद्र फडणवीस यांची भेट आणि चंद्रकांत पाटील यांच्या भेटीमुळे. त्यानंतर, आता दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या कार्यालयात उद्धव ठाकरेसोबत एकनाथ शिंदे गटातील पितापुत्राची झालेल्या भेटीची चर्चा सध्या प्रसार माध्यमात जोरात रंगली आहे.

निवृत्तीनंतर लगेचच घेतली भेट

यापूर्वीच उद्धव ठाकरे यांनी शिवसेना (Shivsena) पक्ष सोडून गेलेल्यांबाबत विचार करणार नसल्याचे स्पष्ट सांगितले आहे. विशेष म्हणजे गुरुवारीच विप्लव बजोरिया हे विधानपरिषदेतून निवृत्त झाले आहेत. विधानपरिषेदेचे आमदार म्हणून त्यांनी 6 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला. मात्र, निवृत्तीनंतर लगेचच त्यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतल्याने शिवसेना शिंदेंच्या गटात खळबळ उडाली आहे.

Uddhav Thackeray, Eknath Shinde
Video Ajit Pawar : मध्य प्रदेशमध्ये गेम चेंजर ठरलेली योजना महाराष्ट्रात! 'लाडकी बहीण योजने'तून महिन्याला मिळणार दीड हजार रुपये

दानवेंच्या कार्यालयात उद्धव ठाकरेंची घेतली भेट

शुक्रवारी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांच्या कार्यालयात उद्धव ठाकरे यांची गोपीकिशन बजोरिया आणि विप्लव बजोरिया या पिता-पुत्रांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. हे दोन्ही नेते उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी दुपारी पोहोचले होते. ठाकरेंच्या शिवसेना पक्षात पुन्हा घेण्याबाबत या दोघांकडून विनंती करण्यात आली. मात्र, उद्धव ठाकरे यांनी त्यांना स्पष्ट शब्दात नकार दर्शवला आहे.

Uddhav Thackeray, Eknath Shinde
Maharashtra Budget 2024 : उद्धव ठाकरे यांनी अर्थसंकल्पाचे वाभाडेच काढले; केली मोठी मागणी...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com