MP Disqualification : ठाकरेंचे खासदार एकनाथ शिंदेंच्या व्यासपीठावर गेले तर अपात्र ठरणार, 'त्या' प्रकरणामुळे धाकधूक वाढली!

Uddhav Thackeray MP Eknath Shinde : आज शिवसेनेचा वर्धापन दिना साजर होतो आहे. ठाकरेंची साथ सोडलेले खासदार शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करण्याची चर्चा आहे.
Political speculation intensifies over the future of Shiv Sena UBT MPs, with the Anti-Defection Law emerging as a key factor in any possible split.
Political speculation intensifies over the future of Shiv Sena UBT MPs, with the Anti-Defection Law emerging as a key factor in any possible split.sarkarnama
Published on
Updated on

Uddhav Thackeray News : एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या वर्धापन दिना निमित्त आज फुटलेले खासदार शिदेंसोबत व्यासपीठावर उपस्थित राहिले तर ते अपात्र ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. स्वतंत्र गट म्हणून मान्यता मिळण्याआधी अन्य पक्षाच्या व्यासपीठावर गेल्याच्या कारणाखाली त्यांची खासदारकी अपात्र ठरेल, असे घटनातज्ज्ञांचे मत आहे.

यापूर्वी समाजवादी नेते शरद यादव हे खासदार असताना विरोधी पक्षांच्या व्यासपीठावर गेले होते. त्यावेळी त्यांना खासदार म्हणून अपात्र ठरण्यात आले होते. त्यामुळे ठाकरेंचे फुटलेले खासदार आज शिंदेंच्या सोबत वर्धापन दिनाला उपस्थित दिसणार नसल्याची चर्चा आहे.

शरद यादव हे राज्यसभेच्या खासदार होते मात्र नितीश कुमार हे भाजपसोबत गेल्याने ते लालू प्रसाद यादव यांच्या व्यासपीठावर गेले होते. त्यावेळी राज्यसभा अध्यक्षांकडे नितीश कुमार यांच्या पक्षाने शरद यादव यांना अपात्र ठरवण्याची मागणी केली होती. तेव्हा शरद यादव यांना अपात्र ठरण्यात आले होते.

दरम्यान, सहा खासदारांच्या स्वतंत्र गटाला मान्यता मिळाली आहे की नाही याची अधिकृत माहिती समोर आली नाही. खासदारांनी आपला स्वतंत्र गट करण्यासंदर्भात लोकसभा अध्यक्षांना पत्र दिले होते. दरम्यान, पक्षादेश झुगारल्या बाबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने सहा खासदारांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

Political speculation intensifies over the future of Shiv Sena UBT MPs, with the Anti-Defection Law emerging as a key factor in any possible split.
Bhausaheb Wakchaure Shirdi : खासदार वाकचौरेंविरोधात संताप! 'चप्पलांचा हार', ‘गद्दार’, 'लालची कुत्रा' म्हणत रास्ता रोको, तर विखे अन् खताळांचा थेट इशारा

लोकसभा अध्यक्षांसमोर होणार परेड

मिळालेल्या माहितीनुसार, स्वतंत्र गट म्हणून मान्यता देण्यासाठी लोकसभा अध्यक्षांना पत्र देण्यात आले आहे. या पत्रातील स्वाक्षऱ्यांची खातरजमा केली जाणार आहेत. तसेच या खासदारांची परेड लोकसभा अध्यक्षांसमोर होणार आहे.

Political speculation intensifies over the future of Shiv Sena UBT MPs, with the Anti-Defection Law emerging as a key factor in any possible split.
Tukaram Mundhe latest FDA action : तुकाराम मुंढेंचा मुंबईत धडाका! FDAची मोठी कारवाई, टनभर भेसळयुक्त मिठाई अन् मावा जप्त

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com