Mharashtra Politics: ठाकरे बंधू एकत्र आल्याने फडणवीस-शिंदेंना धडकी भरली का? महाराष्ट्रात नवं राजकीय पर्व

Uddhav Thackeray–Raj Thackeray alliance: ठाकरे कुटुंबाचा प्रभाव मुंबईसह ठाणे, कल्याण–डोंबिवली, नाशिक, वसई–विरार अशा महापालिकांमध्ये आजही कायम आहे. ठाकरे एकत्र आल्यास आगामी महापालिका निवडणुकांमध्ये भाजप आणि शिंदे गटासमोर मोठे आव्हान उभे राहू शकते.
Uddhav Thackeray–Raj Thackeray alliance
Uddhav Thackeray–Raj Thackeray allianceSarkarnama
Published on
Updated on

ठाकरे एकत्र येणं म्हणजे केवळ दोन नेत्यांचा राजकीय निर्णय नाही, तर मराठी मतदारांचे एकत्रीकरण, शिवसेनेची मूळ ओळख आणि शहरी राजकारणावर पुन्हा पकड मिळवण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळेच भाजप आणि एकनाथ शिंदे गटाला ठाकरे एकत्र येण्याची भीती वाटते, हे स्पष्टपणे दिसून येते.

महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा ठाकरे कुटुंब एकत्र आल्याने अनेक ठिकाणची राजकीय समीकरण बदल्यास सुरवात झाली आहे. ठाकरे एकत्र आल्याची सर्वात जास्त भीती हे भाजपपेक्षा शिंदेसेनेला वाटते. ठाकरे एकत्र आल्याने भाजपने शिंदे यांच्या शिवसेनेला मुंबई महापालिकेच्या जादा जागा देऊ केल्या. त्यांच्यात दोनशे जागांवर एकमत झाले असून, आता शिंदे यांची स्वबळाची भाषा कमी झाली आहे.

ठाकरेंच्या युतीवर भाजपने सावधपणे प्रतिक्रिया दिली. त्यापेक्षाही एकनाथ शिंदे गटाची प्रतिक्रिया जास्त टोकदार होती. त्याचे कारण भाजपपेक्षा शिंदे गटाला ठाकरे एकत्र आल्याची भीती जास्त वाटते. काँग्रेस-राष्ट्रीय समाज पक्ष एकत्र आला आहे. अजित पवार यांच्या आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका अद्याप ठरलेली नाही.

या पार्श्वभूमीवर कुणाचे किती मतविभाजन होते, कोणत्या मुद्द्यावर प्रचारात भर दिला जातो, भाजप आणि शिंदे गट दोन्ही ठाकरे यांच्या गडांना अजून किती धक्के देतात, यावर मुंबई महापालिकेच्या निवडणुकीतील यशाची गणिते अवलंबून आहेत.

मुंबई महापालिका ही देशातील सर्वात श्रीमंत महापालिका मानली जाते. ठाकरे कुटुंबाचा प्रभाव मुंबईसह ठाणे, कल्याण–डोंबिवली, नाशिक, वसई–विरार अशा महापालिकांमध्ये आजही कायम आहे. ठाकरे एकत्र आल्यास आगामी महापालिका निवडणुकांमध्ये भाजप आणि शिंदे गटासमोर मोठे आव्हान उभे राहू शकते. मुंबई महापालिकेवर अनेक वर्ष शिवसेनेचे अर्थात ठाकरे सेनेचे वर्चस्व होते. ही महापालिका आपल्या ताब्यात असावी, यासाठी भाजपसह शिंदे सेनेने चंग बांधला आहे.

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आल्याने मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर मोठ्या प्रमाणात मतदार एकवटू शकतो. उद्धव ठाकरे (शिवसेना–उबाठा) आणि राज ठाकरे (मनसे) एकत्र आल्याने मराठी अस्मितेचा मतदार मोठ्या प्रमाणात एका बाजूला झुकू शकतो. हा मतदारवर्ग मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, ठाणे–कोकण पट्ट्यात निर्णायक ठरतो. हा मतदारवर्ग एकत्र आल्यास महायुतीसाठी हा मोठा धोका ठरु शकतो.

महाविकास आघाडी भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील महायुती आघाडीशी स्पर्धा करण्यात अपयशी ठरली आहे. शिवसेना (यूबीटी), काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांची युती विधानसभा आणि त्यानंतरच्या नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीत महायुतीसमोर टिकू शकली नाही. निवडणूकांमध्ये झालेल्या पराभवानंतर,त्यांचे भविष्यही प्रश्नचिन्हात आहे.

Uddhav Thackeray–Raj Thackeray alliance
Solapur Politics News: रोजंदारी करणाऱ्या आईच्या अंगावर विजयाचा गुलाल: मित्रांच्या मदतीने दोन्ही लेकरांनी जिंकवलं

बाळासाहेब ठाकरे नावाचा प्रभाव

महाराष्ट्रात आजही बाळासाहेब ठाकरे हे नाव भावनिक आणि राजकीयदृष्ट्या ताकदवान आहे. “बाळासाहेबांचे वारस एकत्र” हा मुद्दा आगामी निवडणुकांमध्ये परिणाम करणारा ठरणार आहे.

या मुद्दा निवडणुकीत मोठं राजकीय वातावरण तयार करू शकतो, भाजप–शिंदे गटासाठी हा सर्वात मोठा धोका मानला जातो.हाच मुद्दा भाजप आणि शिंदे गटासाठी सर्वात जास्त चिंतेचा मानला जातो.

‘खरी शिवसेना’

शिवसेनेत फुट पडल्यानंतर शिंदे गटाची ‘खरी शिवसेना’ ओळख ठाकरे एकत्र आल्याने धोक्यात येण्याची चिन्ह आहेत. शिवसेना फुटीनंतर शिंदे गटाने ‘खरी शिवसेना’ असल्याचा दावा केला आहे.पण जर उद्धव–राज एकत्र आल्याने बाळासाहेब ठाकरे यांच्या वारशाशी जोडलेला मतदार हा पुन्हा ठाकरे कुटुंबाकडे वळू शकतो. उद्धव-राज ठाकरे एकत्र शिंदेच्या शिवसेनेला स्वतंत्र जनाधार कमकुवत होण्याची भीती आहे.

विरोधी आघाडी

ठाकरे बंधू एकत्र आल्याने काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत एक मजबूत विरोधी आघाडी उभी राहू शकते. लोकसभा, विधानसभा तसेच स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये भाजपला एकहाती वर्चस्व राखणे कठीण जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. ठाकरे एकत्र येणं म्हणजे केवळ दोन नेते नाहीत, तर मराठी मतदारांची मोट, शिवसेनेची मूळ ओळख, शहरी राजकारणावर पुन्हा पकड म्हणूनच भाजप आणि एकनाथ शिंदे गटाला ठाकरे एकत्र येण्याची भीती वाटते, हे स्पष्ट दिसून येतं.

BMC भाजपसाठी सोपी नाही

नुकत्याच झालेल्या नगरपंचायत आणि नगरपालिका निवडणुकीत भाजप नंबर एकचा पक्ष बनला आहे. महायुतीने नगरपालिका, नगरपंचायतीत चांगली कामगिरी केली तरीही मुंबई महापालिका निवडणूक भाजपसाठी सोपी नाही, हे मात्र नक्की आहे. ठाकरे बंधूंच्या एकत्र आल्यामुळे मराठी मतांचे विभाजन टाळता येणार आहे. ठाकरे बंधू भाषणाला उभे राहिले की मराठी माणसांचा मुद्दा पुढे करतात. आता ठाकरे कुटुंबाच्या पुनर्मिलनामुळे हा उत्साह पुन्हा निर्माण होण्याची शक्यता आहे. विशेषतः ते मराठी मतपेढ्यांना आकर्षित करण्यावर लक्ष केंद्रित करत आहेत. त्यामुळे भाजपला काळजी वाटणे स्वाभावीक आहे.

मुंबई महानगरपालिका व शहरी राजकारण

  • मुंबई, ठाणे, कल्याण–डोंबिवली, वसई–विरार अशा महापालिकांमध्ये ठाकरे ब्रँडचा प्रभाव मोठा आहे.

  • एकत्र आले तर भाजपचे शहरी गणित बिघडू शकते

  • शिंदे गटाला “खरी शिवसेना” हा दावा सिद्ध करणं कठीण जाऊ शकतं

शिंदे गटाची वैचारिक कोंडी

शिवसेना फुटीनंतर शिंदे गट भाजपसोबत सत्तेत आहे. पण ठाकरे एकत्र आल्याने मूळ शिवसेना मतदार भावनिकदृष्ट्या उद्धव–राजकडे झुकू शकतो. शिंदे गटाचा स्वतंत्र जनाधार कमकुवत दिसू शकतो

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com