
Mumbai News : प्रयागराजमध्ये झालेल्या महाकुंभावरून शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे व माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एकमेकांवर जोरदार टीका केली. एकनाथ शिंदे हे नुकतेच महाकुंभ मेळ्यासाठी प्रयागराजला जाऊन आले. त्यानंतर त्यांनी उद्धव ठाकरे हे प्रयागराजमध्ये झालेल्या महाकुंभाला गेले नसल्याने त्यांचे नाव न घेता काही नेत्यांनी हिंदुत्व सोडले असल्याची टीका केली होती. यावरून मराठी भाषा दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना जोरदार टोला लगावला.
शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. ‘मला आता गंगेचं पाणी दिले मला मान आहे सन्मान आहे, इकडे पन्नास खोके घेतले आणि तिकडे डुबकी मारायची याला काय अर्थ? कितीही डुबक्या मारा गद्दारीचा शिक्का पुसला जाणार नाही,’ असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला.
मराठी भाषा दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी जोरदार टोलेबाजी केली. या ठिकाणी जमलेल्या माझ्या तमाम मराठी बंधुनो आणि मातांनो, उद्या पेपरला येईल की उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व सोडले. त्यामुळे आजपासूनच सुरु करा की गर्व से कहो हम हिंदू है आणि अभिमानाने म्हणा मी मराठी आहे. एक ठिणगी पडली आणि उपऱ्याचे आक्रमण बाजूला केलं ती म्हणजे शिवसेना. शिवजयंती झाली, महाशिवरात्री झाली, गुढीपाढवा येईल व्हाटसअपवर तुम्ही जे मेसेज पाठवतात ते पण मराठीतच केले पाहिजेत, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
उद्धव ठाकरे म्हणाले, 'काल परवा साहित्य संमेलन झाले, कसलं संमेलन झाले माहिती नाही. विशेष म्हणजे अध्यक्ष यांनी जे विचार मांडले त्यावर चर्चा झाली पाहिजे होती. दिशा दाखवणारे भाषण होते. यावर देशात चर्चा झाली पाहिजे. माझे आजोबा जे विचार मांडायचे त्यांचे आणि त्यांचे विचार मिळते जुळते आहेत. आपल्या देशाचे यान मंगळावर गेले म्हणून आपण फटाके फोडतो पण दुसरीकडे माणसाच्या पत्रिकेत आपण मंगळ शोधतो.'
यावेळी उद्धव ठाकरे यांनी मराठी भाषा दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना त्यांनी मराठी भाषेचे महत्त्व समजावून सांगितले. यावेळी कार्यक्रमास शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत, अनिल देसाई यांच्यासह नेतेमंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.