Uddhav Thackeray News : प्रचार समारोपावेळी उद्धव ठाकरेंचा घणाघात; भाषणातील दहा मुद्दे

Political News : महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीच्या मुंबईमधील प्रचार सांगता सभेत उद्धव ठाकरे यांनी पीएम मोदी, अमित शाह आणि भाजपचा चांगलाच समाचार घेतला.
Uddhav Thackeray
Uddhav ThackeraySarkarnama

Mumbai News : पीएम मोदी यांनी दहा वर्ष सत्तेचा दुरुपयोग केला, त्यांना कायमचं तडीपार करण्याचा निर्णय मुंबईकरांनी केला पाहिजे. मुंबईमध्ये दोन सभा होत आहेत. एका बाजूला तुम्ही आणि दुसऱ्या बाजूला गद्दार आणि भाडोत्री जनता असल्याची टीका माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली.

महाविकास आघाडीच्या (MVA) मुंबईमधील प्रचार सांगता सभेत उद्धव ठाकरे (Uddhav Thckeray) यांनी पीएम मोदी, अमित शाह (Amit Shah) आणि भाजपचा (Bjp) चांगलाच समाचार घेतला. चार जूननंतर तुम्ही केवळ मोदीच राहणार आहात, भाडोत्री फौज घेऊन उद्धव ठाकरेला संपवायला आलेत. संपवण्याचा प्रयत्न करा, हा महाराष्ट्र तुमचे राजकारण याच मातीत गडल्याशिवाय राहणार नाही, अशी सडकून टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. (Uddhav Thackeray News)

Uddhav Thackeray
Raj Thackeray News : राज ठाकरेंचं पंतप्रधान मोदींसमोरच तडाखेबंद भाषण; ठणकावून सांगितल्या '7' डिमांड

भाषणातील मुद्दे :

-शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र, तो शाह मोदी आणि अंबानीचा होऊ देणार नाही.

-तुम्ही आम्हाला सर्टिफिकेट देणारे कोण आहात?

-उद्धव ठाकरे यांनी यांनी नकली शिवसेना, नकली संतानवरूनही त्यांनी मोदींचा समाचार घेतला.

- देशाला तोडण्याचे काम भाजपने केले त्यांना जोडण्याचे काम राहुल गांधींनी केले.

-मणिपूरमध्ये महिलांना जिवंत जळण्याचे काम सुरु असताना त्यांचा आवाज पोहचू नये, यासाठी भाजपने प्रयत्न केले.

- तुम्ही तुमचं सांगा आम्ही आमचं सांगू, तुम्ही आम्हाला सर्टिफिकेट देणारे कोण आहात? अशी विचारणा त्यांनी केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

-जेव्हा इथं काही होत तेव्हा मदतीला सर्वात आधी शिवसैनिक धावून जातो, भाजप कार्यकर्ता जात नाही.

-बचाव कार्याला जाऊन हिंदू मुसलमान असं बघितलं नाही. तुमचा पक्ष स्वातंत्र्यलढ्यात नव्हता, संयुक्त महाराष्ट्रमध्ये देखील नव्हता.

- मोदींनी मागील निवडणुकीत केवळ चौदा सभा घेतल्या. आता मात्र सभांवर सभा घेत आहेत.

-रोड शो ला गर्दी नाही म्हणून गुजरातमधून लोकं आणली गेली. घाटकोपर घटनेची संवेदनशीलता पंतप्रधान मोदींनी दाखवली नाही.

Uddhav Thackeray
Uddhav Thackeray News : 26 मिनिटांच्या भाषणात उद्धव ठाकरेंनी मोदींचं नाव घेतलं एक नाही, दोन नाही तर तब्बल 42 वेळा

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com