Hawala Racket News : 400 कोटींच्या बाद नोटांचा थरार! कर्नाटक ते नाशिक 'हवाला रॅकेट'चा पर्दाफाश; बड्या राजकीय नेत्याचे धागेदोरे?

400 crore hawala racket India : कर्नाटक ते नाशिक पसरलेल्या 400 कोटींच्या हवाला रॅकेटचा पर्दाफाश. या प्रकरणात बड्या राजकीय नेत्यांचे धागेदोरे असल्याचा संशय
Hawala Racket News
Hawala Racket NewsSarkarnama
Published on
Updated on

Hawala Racket News : कर्नाटकात चारशे कोटींच्या नोटा असलेला कंटेनर लुटण्यात आला. त्यातील गुन्हेगारांकडून खंडणी मागण्यात आली. त्याच्या तारा थेट नाशिकशी जुळल्या आहेत. नोटबंदी झाल्याने दोन हजाराच्या नोटा बाद ठरल्या. मात्र ठाणे येथील एका बिल्डरकडे असलेल्या 400 कोटींच्या दोन हजारांच्या बाद नोटा चलन्यात आणण्याचा मोठा डाव उघड झाला आहे. यामध्ये मोठे हवालदार रॅकेट दडल्याचे बोलले जाते.

कर्नाटकात या कंटेनरची लूट करण्यात आली. लूट करणाऱ्यांकडून बिल्डरकडे खंडणी मागण्यात आली. यामध्ये घोटी येथील संदीप पाटील या युवकाचे नाव वापरण्यात आले. त्यातून हा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. ठाणे येथील बिल्डर कडून या नोटा कर्नाटक पाठविण्यात येत होत्या. मुंबईतील एका मोठ्या राजकीय नेत्याच्या माध्यमातून हा प्रकार सुरू होता.

Hawala Racket News
Pune crime news : पुण्यात भाजप सरपंचाच्या सुनेची आत्महत्या; हुंड्याच्या त्रासामुळे 3 वर्षीय मुलीसमोरच गळफास

संबंधित प्रकरणात हवाला रॅकेटचा थेट संबंध असल्याचा पोलिसांचा संशय आहे. या नोटा एका मोठ्या देवस्थानात दिल्या जाणार होत्या. येथून कायदेशीर पळवटांचा लाभ घेऊन त्या चलनात आणण्याचा मोठा डाव होता. यासंदर्भात नाशिकच्या पोलिसांनी केलेल्या तपासात हा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. 400 कोटींच्या बाद नोटांचा कंटेनर लुटण्यात आला. त्याचा तपास आता शेवटच्या टप्प्यात आहे.

यासंदर्भात 22 ऑक्टोबरला घोटी येथील संदीप पाटील यांनी एक व्हिडिओ व्हायरल केला होता. संदीप पाटील याचे गुन्हेगारांनी अपहरण करून चारशे कोटींच्या कंटेनर लूट प्रकरणात नाव घेतले होते. त्यामुळे संदीप पाटील याने पोलिसांकडे तक्रार केली होती. अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या नेतृत्वाखाली एसआयटीची स्थापना करण्यात आली होती. या पथकाने केलेल्या तपासात राजकीय नेत्यांचे कनेक्शन आणि देवस्थान याच्या माध्यमातून हवाला रॅकेटद्वारे हा व्यवहार झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com