Pune crime news : पुण्यात भाजप सरपंचाच्या सुनेची आत्महत्या; हुंड्याच्या त्रासामुळे 3 वर्षीय मुलीसमोरच गळफास

Dipti Magar suicide case Pune : पुण्यात दीप्ती मगार आत्महत्या प्रकरणात 25 तोळे सोनं आणि हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप. पतीसह तीन सासरच्यांना अटक.
Pune Crime Dipti magar suicide case
Pune Crime Dipti magar suicide case Sarkarnama
Published on
Updated on

पुणे जिल्ह्यातील उरळी कांचन परिसरात विवाहित महिलेच्या आत्महत्येने पुन्हा एकदा समाजाला हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. शिक्षण आणि प्रगतीचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात सासरच्या मानसिक छळामुळे एका तरुण विवाहितेने आयुष्य संपवल्याने हळहळ व्यक्त होत आहे. हुंड्यासाठी होणाऱ्या सातत्यपूर्ण मानसिक, शारीरिक आणि आर्थिक छळाला कंटाळून एका विवाहित महिलेने आपल्या तीन वर्षांच्या मुलीसमोरच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.

मृत महिलेचे नाव दीप्ती मगर असून तिचा विवाह 23 नोव्हेंबर 2019 रोजी रोहन चौधरी यांच्याशी झाला होता. सुरुवातीला सर्व काही सुरळीत सुरू असले तरी लग्नानंतर काही महिन्यांतच छळाला सुरुवात झाली. पतीकडून दीप्तीच्या चारित्र्यावर संशय घेण्यात येत होता. तसेच “तू दिसायला साजेशी नाहीस, तुला घरकाम येत नाही,” अशा अपमानास्पद शब्दांत तिचा मानसिक छळ केला जात होता, असा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.

Pune Crime Dipti magar suicide case
Nashik Mayor Decision : नाशिक महापौरपदाचा पेच: हिमगौरी आडकेंचे पारडे जड; नेत्यांकडून मात्र 'सस्पेन्स' कायम!

लग्नाच्या पाच वर्षांनंतर दीप्तीला मुलगी झाली. मात्र मुलगी झाल्याने सासरच्या मंडळींनी नाराजी व्यक्त केली. डिलिव्हरीनंतर दीप्ती सासरी परत गेल्यावर व्यवसायासाठी पैशांची मागणी करण्यात आली. यावेळी तिच्या आई-वडिलांनी 10 लाख रुपये दिले. त्यानंतर लग्नात गाडी दिली नसल्याचा मुद्दा उपस्थित करत पुन्हा 25 लाख रुपयांची मागणी करण्यात आली, तीही रोख स्वरूपात दिल्याचे तक्रारीत नमूद आहे.

दीप्तीला लग्नात मिळालेले सुमारे 25 तोळे सोन्याचे दागिने सुरक्षिततेच्या कारणास्तव सासरच्यांनी स्वतःकडे ठेवले होते. मात्र पुढे एका कार्यक्रमासाठी दागिने मागितले असता ते व्यवसायासाठी गहाण ठेवल्याचे सांगण्यात आले. ऑक्टोबर 2025 मध्ये सासू सुनिता चौधरी सरपंच झाल्यानंतर पुन्हा आर्थिक मागण्या वाढल्याचा आरोप आहे.

दीप्ती गर्भवती असताना गर्भलिंग तपासणीसाठी दबाव टाकण्यात आला. गर्भ मुलगी असल्याचे समजताच पाच महिन्यांचा गर्भ जबरदस्तीने गर्भपात करून काढण्यात आल्याचा गंभीर आरोपही फिर्यादीत करण्यात आला आहे. याशिवाय दीप्तीच्या नावावर असलेली जमीन आणि फार्महाऊस विकण्यासाठीही तिच्यावर दबाव होता.

Pune Crime Dipti magar suicide case
BJP Shiv Sena tension : बीएमसी रणसंग्राम पेटला! दिल्लीचा आदेश, फडणवीस 'ॲक्शन मोड'मध्ये; शिंदेंची दरे गावाकडे कूच?

सततच्या छळामुळे मानसिक तणावात गेलेल्या दीप्तीने 24 जानेवारी रोजी आपल्या राहत्या घरी आत्महत्या केली. या घटनेने वैष्णवी हगवणे प्रकरणाची आठवण पुन्हा ताजी झाल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे. या प्रकरणी हेमलता बाळासाहेब मगर यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी पती रोहन चौधरी, सासू सुनीता चौधरी आणि दीर यांच्याविरोधात आत्महत्येस प्रवृत्त करणे, हुंडाबळी तसेच गर्भलिंग तपासणी प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हे दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com