Nagar News : अवकाळी पाऊस व पाणी टंचाई यासारख्या समस्यांचा सामना करतानाच दुधाळ जनावरांचे चारा-पाणी, दूध संकलन व विक्रीचे गणित जुळवण्याचे आव्हान दूध उत्पादकांसमोर होते. त्यातच दुधाचे दर घटल्यामुळे दूध उत्पादकांच्या चिंतेत भर पडली. त्यावर उपाय म्हणून राज्य सरकारने दूध अनुदान योजना केली. या योजनेचा लाभ आता दूध उत्पादकांना मिळाला आहे.
नगर जिल्ह्यातील 90 हजार 566 दूध उत्पादकांना सुमारे 76 कोटी रुपयांचे अनुदान मिळाले आहे. योजनेअंतर्गत 11 जानेवारी ते 10 मार्च या कालावधीत अनुदान मंजूर झाले. सुरुवातीला तांत्रिक बाबी पूर्ण करून अनुदानासाठी रेकॉर्ड तयार करण्यात आले. उत्पादक व जनावरे तसेच दूध उत्पादनाची माहिती घेण्यात आली. त्यानुसार 90 हजार पेक्षा जास्त उत्पादकांच्या खात्यात एकूण 76 कोटी 8 लाख 56 हजार 795 रुपये एवढी अनुदानाची (Milk Subsidy) रक्कम जमा करण्यात आली आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
दूध उत्पादकांना अनुदान मिळावे, यासाठी महसूल तथा दुग्धविकास तथा पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे (Radhakrishna Vikhe) यांनी मोठी भूमिका बजावली. नगर जिल्ह्यात सर्वात जास्त संगमनेर येथील 23 हजार 304 दूध उत्पादकांना अनुदान मंजूर झाले. त्याखालोखाल राहुरी येथील 12 हजार 60 आणि राहाता येथील 10 हजार 853 दूध उत्पादकांना अनुदान मिळाले. याशिवाय नगर जिल्ह्यातील काही दूध उत्पादक शेतकरी (Farmer) शेजारील जिल्ह्यातील दूध संघांना दूध पुरवठा करतात. अशा शेतकऱ्यांची माहिती जिल्हा दुग्धव्यवसाय विभागाने संकलित केली आहे. हे दूध उत्पादक अनुदानापासून वंचित राहू नये यासाठी पशुसंवर्धन विभागाकडून प्रयत्न सुरू आहे. Rs 76 crore subsidy category to 91 thousand milk producers in Nagar district
अकोले 5 हजार 820 (तीन कोटी 68 लाख 10 हजार 172 रुपये), संगमनेर 23 हजार 304 (16 कोटी 15 लाख 77 हजार 255 रुपये), कोपरगाव 7 हजार 950 (पाच कोटी 13 लाख 95 हजार 920 रुपये), राहाता 10 हजार 853 (सात कोटी 88 लाख 66 हजार 35 रुपये), श्रीरामपूर 5 हजार 121 (तीन कोटी 78 लाख 59 हजार 155 रुपये), नगर 4 हजार 177 (तीन कोटी तीन लाख 89 लाख 725 रुपये), पारनेर 5 हजार 967 (सहा कोटी 68 लाख 36 हजार 445 रुपये), पाथर्डी 2 हजार 381 (दोन कोटी 59 लाख 70 हजार 265 रुपये), राहुरी 12 हजार 60 (11 कोटी 80 लाख 40 हजार 90 रुपये), श्रीगोंदा 3 हजार 151 (तीन कोटी 85 लाख 56 हजार 270 रुपये), शेवगाव 426 (46 लाख 43 हजार 435 रुपये), जामखेड 1 हजार 533 (2 कोटी 78 लाख 4 हजार 700 रुपये), कर्जत 4 हजार 460 (पाच कोटी 79 लाख 59 हजार 920 रुपये)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.