Jalgaon Corporators Hunger Strike: 'प्रशासन विरूद्ध नगरसेवक' संघर्ष पेटला; भाजप नेत्याचं आयुक्तांविरोधात उपोषणास्त्र!

Prashasan Vs Corporators In Jalgaon: "शिवसेना ठाकरे गटासह , एमआयएमच्याही नगरसेवकांनी पाठिंबा.."
Jalgaon Politics
Jalgaon PoliticsSarkarnama
Published on
Updated on

Jalgaon News : जळगावमध्ये विकासाच्या मुद्द्यावरून महापालिका प्रशासन विरुद्ध नगरसेवक असा संघर्ष सुरू झाला आहे. राज्यात सत्ताधारी असलेल्या भाजप पक्षाचे नगरसेवक आश्विन सोनवणे यांनी आयुक्त विद्या गायकवाड यांच्या बदलीच्या मागणीसाठी साखळी उपोषण सुरू केले आहे. या उपोषणाला शिवसेना ठाकरे गटासह , एमआयएमच्याही नगरसेवकांनी पाठिंबा दिला. यामुळे आता प्रशासन आणि नगरसेवक असा संघर्ष उफाळून आला आहे. (Latest Marathi News)

Jalgaon Politics
Bihar Politics : एनडीए-'INDIA'च्या बैठकांपासून अलिप्त असलेल्या VIP ची नवी रणनीती

जळगाव शहरात रस्त्यातीवरील खड्डे, कचरा-सफाई, रस्त्यात साचणारे पावसाचे पाणी या गंभीर समस्या आहेत. महापालिकेच्या सभेत प्रश्न वारंवार मांडूनही प्रशासन याकडे लक्ष देत नसल्याचा आरोप, सर्वच नगरसेवकांनी केला आहे. त्याच्याच निषेधार्थ भाजप नगरसेवक डॉ.आश्विन सोनवणे यांनी साखळी उपोषण सुरू केले आहे. त्यांनी थेट आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांच्या बदलीची मागणी केली आहे.

Jalgaon Politics
INDIA Meeting News : मुंबईतील 'इंडिया'च्या बैठकीची तारीख ठरली! पवार-थोरात-पटोले भेटीकडे लक्ष..

राज्यात भारतीय जनता पक्ष सत्तेवर आहे, अशा स्थितीत भाजप नगरसेवकांनी आयुक्तांच्या बदलीच्या मागणीसाठी उपोषण सुरू केल्याने आपल्याच पक्षाच्या नगरसेवकांच्या मागणीकडे राज्यातील शासन काय भूमिका घेणार? याकडे आता जळगावकर नागरीकांचे लक्ष आहे. विशेष म्हणजे जळगाव महापालिका नगरसेवकांची मुदत आता केवळ दोन महिन्यात राहिली आहे. त्यात आता वाद सुरू झाल्याने राजकीय चर्चा सुरू झाल्या आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com