Sanjay Raut News
Sanjay Raut News Sarkarnama

Sanjay Raut News : '' राऊतांनी किमान साताऱ्यात येताना तोंडाला लगाम लावावा; नाहीतर...'' ; शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखाचा गर्भित इशारा

Satara Political News : ''...म्हणूनच सारा महाराष्ट्र राऊतांना शिव्यांची लाखोली वाहतोय ! ''
Published on

Satara : ज्याने आपल्या भंपक आणि वाचाळवीर तोंडानं ठाकरे सेना संपवली आहे. त्या संजय राऊतांची मंत्री शंभूराज देसाई यांच्यावर बोलण्याची लायकी नाही. मात्र,त्यांनी सातारा जिल्ह्यात येऊन हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची प्रतारणा केली किंवा त्यांच्या विचारांचा अवमान थांबवला नाहीतर त्याच्या तोंडात शेण कोंबण्याची धमक आमच्या ठायी नक्की आहे असा इशारा शिवसेनेचे सातारा जिल्हाप्रमुख जयवंतराव शेलार यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला आहे.

शिवसेने(Shivsena)च्या सातारा जिल्हाप्रमुखांनी काढलेल्या प्रसिध्दीपत्रकात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांवर जोरदार निशाणा साधला आहे. यात भंपक आणि खाणेरड्या तोंडाने सुसंस्कृत महाराष्ट्रात घाण कालविणारा संजय राऊत आज शिवरायांची राजधानी असलेल्या सातारा जिल्ह्यात आला. ज्याला त्याचा बाप आणि त्याचा आजोबा नीट सांगता आला नाही, तो सातारा जिल्ह्यात येऊन भुंकतो आहे?

Sanjay Raut News
Sanjay Raut slams Shambhuraj Desai : बाळासाहेब देसाईंच्या नातवानं शेण खाल्लं ; राऊतांनी शंभूराज देसाईंना डिवचलं..

प्रसिद्धीपत्रकात काय म्हटलंय..?

बाळासाहेब ठाकरे हे शिवसेना स्थापन करत होते. तेव्हा पक्षीय भेद विसरून लोकनेते त्यांच्या पाठीशी होते. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी उभ्या आयुष्यात लोकनेते यांच्या घराण्याकडे पूर्ण सन्मानाने पाहिले असंही पत्रकात म्हटलं आहे.

लोकनेते यांचे नातू शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) हे हिंदुहृदयसम्राट यांच्या समीप येणार हे समजल्यावर स्वतः बाळासाहेब ठाकरे यांनी शंभूराजला इकडे बोलवू नका, मीच तिकडे जाणार असे सांगून शंभूराजेंचा सन्मान केला होता.

...म्हणूनच सारा महाराष्ट्र राऊतांना शिव्यांची लाखोली वाहतोय !

तेव्हा हे भंपक चिटोऱ्या गिरगट बसायचं. त्याला काय हे माहीत? उगाच ट ला ट आणि र ला र लावून शिव्या खाणाऱ्या राऊतांना म्हणूनच सारा महाराष्ट्र शिव्यांची लाखोली वाहत आहे असा हल्लाबोलही शंभूराज देसाई यांच्या समर्थकांनी केला आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेबांनी पहिला लाल दिवा देऊन सन्मान केला आणि शंभूराज यांना आपल्या कवेत घेतले. ही होती बाळासाहेब ठाकरे यांची संस्कृती असल्याचेही पत्रकात म्हटलं आहे.

Sanjay Raut News
Devendra Fadnavis Criticism Ncp Over OBC : '' राष्ट्रवादी काँग्रेससारख्या पक्षात ओबीसी नेते फक्त...'' ; फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल

... तर त्यांच्या तोंडात शेण कोंबल्याशिवाय राहणार नाही !

याच संस्कृतीला तिलांजली देणारा हा संजय राऊत(Sanjay Raut) केवळ लोकनेते व त्यांचे नातू शंभूराज यांचाच नव्हे तर हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा अवमान करत आहे. ठाकरे - देसाई या घराण्यातील ऋणानुबंध हे गेल्या तीन पिढ्यापासून आहेत. आजतागायत यावर कोणी अवाक्षर कोणी बोलले नाही. म्हणजेच कोणी भुंकला म्हणून हे ऋणानुबंध दुरावणार नाहीत.

संजय राऊतांनी किमान सातारा जिल्ह्यात येताना तरी तोंडाला लगाम लावावा, नाहीतर इथली शिवभक्त जनता कोणताही पक्षभेद किंवा गटभेद न ठेवता त्यांच्या तोंडात शेण कोंबल्याशिवाय राहणार नाही असा गर्भित इशारा ही प्रसिद्धी पत्रकातून देण्यात आला आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com