Dr. Bharati Pawar News : महिलांसाठी चांगली सुरुवात; विरोधकांना मात्र दुःख झालं!

A Good start for the womens, but the opposition have not looking happy-संसदेतील महिला आरक्षणाचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला, विरोधकांनी ही संधी गमावली.
Dr. Bharati Pawar
Dr. Bharati PawarSarkarnama

Dr. Pawar on women reservation : देशासाठी आज ऐतिहासिक निर्णय झाला आहे. संसदेत महिलांसाठी आरक्षणाचा २७ वर्षे रेंगाळलेला प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोडवला. महिला लोकप्रतिनिधींसाठी ३३ टक्के आरक्षणामुळे संसदेतील त्यांना प्रतिनिधित्व मिळाले आहे. हा अभिमानाचा क्षण आहे, असे केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी सांगितले. (Today Womens reservation of 33% in loksabha passed)

संसदेत महिलांसाठी (Womens) ३३ टक्के आरक्षणाचे बिल आज मंजूर झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि भाजपने (BJP) हा निर्णय घेतला, त्याचा आनंद आहे, असे केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार (Dr. Bharati Pawar) म्हणाल्या.

Dr. Bharati Pawar
Bhujbal v/s Gholap Politics : बबनराव घोलप यांच्या तोंडी निष्ठेची भाषा शोभत नाही!

नवी दिल्ली येथे पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. त्या म्हणाल्या, आज महत्त्वाचा आणि ऐतिहासिक निर्णय झाला आहे. गेल्या २७ वर्षांपासूनची ही मागणी होती, ती पूर्ण झाली. त्याचा समस्त महिला वर्गाला आनंद झाला आहे.

या निर्णयाने महिलांना संसदेत ३३ टक्के आरक्षण मिळणार आहे. हा कार्यकाळ १५ वर्षांसाठी असेल. या विधेयकामुळे संसदेतील महिला खासदारांची संख्या वाढणार आहे. हा निर्णय घ्यायला मागच्या सरकारने वेळ लावल. मात्र, आता हा निर्णय पंतप्रधान मोदी यांनी घेतला आहे.

या निर्णयाने गावपातळीवरील महिलांनादेखील फायदा होणार आहे. विकासाचा मुद्दा घेऊन मतदारांपुढे जाताना आम्ही महिलांना सोबत घेत आहोत. सगळ्या महिलांच्या आणि भारतवासीयांच्या वतीने आम्ही पंतप्रधान मोदी यांचे आभार मानतो.

मी पहिली महिला खासदार

डॉ. पवार म्हणाल्या, या आरक्षणात उपआरक्षणदेखील असणार आहे. त्यात अनुसूचित जाती, जमातींसाठीदेखील ३३ टक्के आरक्षण मिळणार आहे. मी ज्या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करते, तिथली मी पहिली महिला खासदार आहे.

Dr. Bharati Pawar
NCP Politics in Kolhapur : ...तर जिल्हा बँकेत काय झाले ते सगळं बाहेर काढू : मुश्रीफांना इशारा कुणाचा ?

विरोधकांनी आधीच सांगितलं, की बिलाच्या प्रती मिळाल्या नाहीत. अध्यक्ष हा प्रस्ताव मंजूर करीत असताना विरोधी पक्षाकडून होकार आला नाही. याचा अर्थ एकीकडे सांगायचं, की आम्ही आरक्षणाच्या बाजूने आहोत, पण मतदानाची वेळ आली की समर्थन करायचं नाही, अशी ही नीती आहे.

Dr. Bharati Pawar
Yeola NCP News : भुजबळांच्या मतदारसंघात राज्य सरकारविरोधात झाली तीव्र निदर्शने

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com