Devendra Fadanvis; नेतृत्व डोक्यात गेले तर आपली काँग्रेस होईल!

विधानसभा जिंकण्यासाठी भाजपने महाराष्ट्रात सुरु केले महाअभियान.
Devendra Fadanvis
Devendra FadanvisSarkarnama

नाशिक : (Nashik) 2014 नंतर भाजपला (BJP) जिंकायची सवय लागली आहे. पत्रकारांनाही आपल्याला जिंकलेले पहायची सवय लागली आहे. त्यामुळे एक जरी निवडणूक आपण हरलो तरी आत्मचिंतणाची गरज आहे. मात्र आपल्या डोक्यात नेतृत्वाची हवा गेली तर आपली काँग्रेस (Congress) व्हायला वेळ लागणार नाही, हे गांभिर्याने घेतले पाहिजे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी केले. (BJP will start a Mahaabhiyan for Assembly election of Maharashtra)

Devendra Fadanvis
BJP Mission 200 : भाजप-शिंदे गटाचा 'मिशन 200' चा नारा ; कशी असेल भाजपची रणनीती?

भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यसमितीच्या दोन दिवसीय बैठकीचा समारोप आज येथे झाला. अयावेळी देवेंद्र फडणवीस यांनी नुकत्याच झालेल्या अध्यक्षस्थानी चंद्रशेखर बावकुळे होते. यावेळी आगामी विधानसभा व लोकसभा निवडणुकांसाठी महाअभियान राबविण्याची घोषणा करण्यात आली. त्याचबोरबर पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात सुरु असलेल्या भव्य योजना व कामकाज सामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्याचे आवाहन केले.

Devendra Fadanvis
Konkan News : गुहागरमध्ये मला पाडण्याचा आदेश ‘मातोश्री’तूनच देण्यात आला : रामदास कदमांचा ठाकरेंवर गंभीर आरोप

यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी आणि शिवसेनेचे उद्धव ठाकरे यांच्यावर टिका केली. हिदुत्व व प्रखर राष्ट्रवाद हे भाजपचे ब्रीद आहे. ते घेऊनच यापुढे आपल्याला वाटचाल करायची आहे. त्यासाठी पुढील दिड ते दोन वर्षे आपल्याला पक्षाच्या विस्तारासाठी परिश्रम करावे लागतील. त्यासाठी प्रत्येकाने आपला वेळ द्यावा. त्यातून भाजप निश्चितच राज्यात आपले सरकार स्थापन करेल, यात मला शंका वाटत नाही.

यावेळी विधानपरिषदेच्या निकालांवरून नेत्यांचे कान टोचले. फडणवीस यांच्या विधानावर उपस्थितांत विधानपरिषदेच्या निवडणुकांसंदर्भात गलका झाला. त्यावर ते म्हणाले, 2014 नंतर देशात भाजपची स्थिती बदलली आहे. आपल्याला जिंकायचीच सवय लागली आहे. त्यामुळे एखादी जरी निवडणूक आपण हरलो तर त्याची चर्चा होते. एखाद्या निवडणुकीने आपले भविष्य ठरत नाही. मात्र सजग रहावे लागेल. अमरावतीची निवडणूक आपण हरलो. तीथे आपली पाचते साडे पाच हजार मते बाद होतात. आपला विरोधी उमेदवार तीन हजार मतांनी जिंकतो. हे समजून घेतले पाहिजे. येथे नेत्यांत काय कमी पडले याचा विचार झाला पाहिजे.

Devendra Fadanvis
Supriya Sule : शेतकरी आंदोलनाला राष्ट्रवादीचा पाठिंबा, सुप्रिया सुळेंचा तुपकरांना फोन!

ते म्हणाले, नेत्यांतील कार्यकर्ता नेहेमीच जिवंत असला पाहिजे. नेत्यांनी ताठरपणा ठेवला, नेतृत्व आपल्या डोक्यात गेले तर आपला ऱ्हास व्हायला वेळ लागणार नाही. मोदी यांच्याकडून हे शिकले पाहिजे. मोदी जगातील सर्वात शक्तीशाली नेते आहेत, मात्र ते कधीही संघटनेच्या पुढे जात नाही. प्रत्येक गोष्ट ते संघटनेला विचारूनच करतात.

देशात कोरोनाची साथ आली तेव्हा जग म्हणत होते, भारत काय कोरोनाचा सामना करू शकणार नाही. येथे खुप मृत्यू होतील, मात्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आपण लस तयार केली. मोजक्या चार पाच देशांत लस तयार करणारे आपण होते. आपण 102 कोटी लोकांना 220 कोटी लस दिल्या. ही शक्ती फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामुळे शक्य झाली.

दोन वंदे भारत ट्रेन आपल्याकडे सुरु झाल्या. नाशिक पुणे रेल्वेसाठी मी रेल्वेमंत्र्यांना भेटलो. वंदे भारत ट्रेनची निर्मिती लातुरच्या कोच फॅक्टरीत सुरु होणार आहे. 13500 कोटी रुपयांचा निधी व 124 रेल्वेस्थानकांचा कायाकल्प आपल्याकडे होत आहे. काँग्रेसच्या अर्थसंकल्पात दहा वर्षातही एव्हढे पैसे मिळाले नव्हते. अयोध्यातील राममंदीर व प्रत्येक विषय मोदी यांनी खंबीरपणे उभे राहून केले, असे फडणवीस यांनी सांगितले.

फडणवीस म्हणाले, गेल्या आठ वर्षात ज्यांच्यापर्यंत ज्यांच्याकडे काहीच पोहोचत नव्हते त्यांच्यापर्यंत सुविधा पोहोचवण्याचा काम केले जात आहे. दहा लाख कोटी रुपये पायाभूत सुविधांसाठी खर्च केले जाणार आहे. त्याद्वारे आपल्याला 32 क्षेत्रात रोजगार निर्मिती होते. दरीब कल्याणाचा अजेंडा राबवला जात आहे. आगामी काळात भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेनेचे सरकार ते काम करणार आहे. त्यासाठी भाजपला सामान्य माणसांपर्यंत पोहोचवायची आहे. त्यासाठी तुमच्या सगळ्यांची मदत आम्हाला हवी आहे. हे जेव्हा होईल तेव्हा दिडशे नव्हे तर दोनशे जागा देखील महाराष्ट्रात आम्ही निवडूण आणून दाखवू.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com