Konkan News : गुहागरमध्ये मला पाडण्याचा आदेश ‘मातोश्री’तूनच देण्यात आला : रामदास कदमांचा ठाकरेंवर गंभीर आरोप

उद्धव ठाकरे सतत खोटे बोलतात.
Uddhav Thackeray-Ramdas kadam
Uddhav Thackeray-Ramdas kadamSarkarnama
Published on
Updated on

खेड (जि. रत्नागिरी) : शिवसेना (Shivsena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी स्वतःच्या महत्त्वाकांक्षेसाठी शिवसेनाप्रमुखांच्या विचारांशी प्रतारणा करत काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मांडीला मांडी लावून बसणे पसंत केले. तेच उद्धव ठाकरे आज आम्हाला गद्दार म्हणत खोके घेतल्याची भाषा करत आहेत. मात्र, उद्धव ठाकरे सतत खोटे बोलतात. विधानसभेच्या २००९ च्या निवडणुकीतही मला गुहागर मतदारसंघात पाडण्याचा आदेशही ‘मातोश्री’तूनच दिला गेला, असा आरोप बाळासाहेबांच्या शिवसेनेचे नेते आणि माजी पर्यावरणमंत्री रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी केला आहे. (The order to demolish me in Guhagar was given from 'Matoshri' : Ramdas Kadam serious allegations on Uddhav Thackeray)

रामदास कदम यांनी खेड तालुक्यातील पंधरागाव विभागाचा दौरा केला. दौऱ्यादरम्यान लोटे येथे आयोजित पत्रकार परिषदेत कदम यांनी हा गंभीर आरोप केला. रामदास कदम म्हणाले की, उद्धव ठाकरे आणि त्यांचे सुपुत्र आदित्य हे राज्यभर सांगत सुटलेत की, आम्ही भाजपकडून पैशांचे खोके घेतले. पण, अद्यापही ते आमच्यावरील हा आरोप सिद्ध करू शकलेले नाहीत. आम्ही जर खोके घेतलेच असतील, तर ते आताच्या शिंदे-फडणवीस सरकारकडून विकासकामांच्या निधीचे.

Uddhav Thackeray-Ramdas kadam
Solapur Politics : सोलापुरातील काँग्रेस-राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांचे अखेर ‘हातात हात’ : रोहित पवारांचा पुढाकार

जनतेने आमच्या शिवसेना-भाजप युतीला मतदान केले होते; मात्र हा जनादेश झुगारून उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडी स्थापन करून काँग्रेसबरोबर गेले. हा मतदारांशी केलेला द्रोह होता. म्हणून आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आघाडीतून बाहेर पडलो आणि जनतेच्या मनातील सरकार स्थापन केले. आम्हाला आघाडी सरकारमध्ये मंत्रिपद मिळाले असते. मात्र, आम्हाला राष्ट्रवादीच्या ताटाखालचे मांजर व्हायचे नव्हते. त्यामुळे मंत्री होण्यापेक्षा आमदार म्हणून सन्मानाने विकासकामे करण्यात आम्हाला आनंद आहे, असेही कदम म्हणाले.

Uddhav Thackeray-Ramdas kadam
Baramati News : मोदी सरकारच्या निर्णयामुळे बारामतीच्या ‘माळेगाव’चा ३१९ कोटींचा टॅक्स माफ; साडेपाच कोटी व्याजासह परत मिळणार

'उद्धवजी खेडमध्ये येण्याची वाट पाहतोय'

राष्ट्रवादीचे माजी आमदार संजय कदम यांना शिवसेनेत घेऊन मला शह द्यायचे कारस्थान चालू आहे. त्यांच्या पक्षप्रवेशावेळी उद्धव ठाकरे खेड येथे विशाल सभा घेणार असल्याचे सांगितले जाते आहे. उद्धवजी खेडमध्ये येण्याची मी वाटच बघत आहे. ठाकरे यांच्या सभेनंतर लगेचच प्रत्युत्तर सभा घेणार असल्याचे रामदास कदम यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com