Eknath Shinde Politics: एकनाथ शिंदेंच्या शिलेदारांची महापालिकेसाठी सावध पावले, महायुती तर महायुती अन्यथा स्वबळाची तयारी!

A tug-of-war in the grand alliance is possible in Nashik, BJP is aggressive in seat distribution, Shiv Sena Shinde's party is taking cautious steps -स्थानिक स्वराज्य संस्था आणि महापालिका निवडणुकीत भाजप सहकारी पक्षांची जागा वाटपात कोंडी करण्याची भीती आहे.
Girish Mahajan & Eknath Shinde
Girish Mahajan & Eknath Shinde Sarkarnama
Published on
Updated on

NMC Mahayuti News: राज्यातील महापालिका निवडणुका केव्हाही जाहीर होऊ शकतात. त्यादृष्टीने सर्वच पक्ष सक्रिय झाले आहेत. नाशिकमध्ये महापालिका निवडणुकीसाठी सत्ताधारी महायुती आक्रमकपणे कामाला लागली आहे.

महायुतीच्या घटक पक्षात भाजप मोठा भाऊ आहे. शिवसेना एकनाथ शिंदे पक्ष हा आक्रमक सहकारी आहे. त्यामुळे सातत्याने भाजप आणि शिवसेना शिंदे पक्षात ठाणे, मुंबई, नवी मुंबई महापालिकांच्या जागावाटप आणि निवडणुकांवरून कुरबुरी सुरू आहेत.

नाशिकमध्येही महायुतीच्या घटक पक्षांमध्ये अशीच ओढाताण सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष नाशिक शहरात भाजप देईल ते स्वीकारण्यास तयार आहे. या पक्षाची संघटनात्मक आणि राजकीय तयारी देखील फारशी आक्रमक नाही. त्यामुळे भाजपने अजित पवार पक्षाला गृहीत धरल्यासारखेच वातावरण आहे.

Girish Mahajan & Eknath Shinde
Narhari Zirwal Politics: मंत्री नरहरी झिरवाळ जिल्हा परिषदेसाठी आक्रमक, दिंडोरीत सुरू केली स्वबळाची तयारी? मुलगा गोकुळ झिरवाळ यांना दिला हा पर्याय!

भाजपने नाशिक शहरासाठी हंड्रेड प्लस अशी घोषणा केली आहे. च्या निवडणुकीत या पक्षाकडे ६५ नगरसेवक होते. गेल्या काही महिन्यात विरोधी पक्षातील अनेक प्रबळ आणि माजी नगरसेवकांना भाजपने पक्षात प्रवेश दिला आहे.

Girish Mahajan & Eknath Shinde
Shivsena Vs BJP Politics: एकनाथ शिंदे पक्षाने केली भाजपची गोची; यादीत शोधली २.९८ लाख संशयास्पद मतदार!

या सर्व हालचालींमुळे शिवसेना शिंदे पक्ष सावध झाला आहे. या पक्षाने देखील सुरुवातीच्या टप्प्यात ३२ माजी नगरसेवकांना पक्षात प्रवेश दिला आहे. या पक्षाकडे उमेदवारी मिळेल म्हणून अनेकांनी प्रवेश केला आहे. भाजपने जागा वाटपात अडथळा आणल्यास शिवसेना शिंदे पक्षाची कोंडी होऊ शकते.

या संदर्भात पक्षाचे संपर्क नेते अजय बोरस्ते यांनी देखील वेळ पडल्यास स्वबळावर निवडणुकीचे संकेत दिले आहेत. शहरातील सर्व प्रभागांमध्ये संघटनात्मक यंत्रणा कार्यरत करण्यात आली आहे. बुथ स्तरावर पक्षाची यंत्रणा सक्षम करण्यावर सध्या भर देण्यात आला आहे.

महायुतीत जागा वाटपांवरून संघर्ष अटळ असल्याचे सध्याचे चित्र आहे. महापालिकेवर स्वबळावर सत्तेत येण्याचा निर्धार महायुतीच्या प्रत्येक पक्षाने केला आहे. या आक्रमक धोरणामुळेच शिवसेना शिंदे पक्षानेही सावध पावले टाकण्यास सुरवात केली आहे.

महायुती झाल्यास काही इच्छुकांवर अन्याय होऊ शकतो. हे विचारात घेऊनच स्वबळाची तयारी सुरू केली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिक महापालिकेबाबत जो निर्णय घेतील त्यावर कार्यवाही होईल. मात्र सहकारी पक्षाकडून जागावाटपात भाजपने कात्रजचा घाट दाखवला गेल्यास सावधगिरीचा पवित्रा शिवसेना शिंदे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी घेतला आहे. त्यामुळे महायुतीत जळगावमध्ये घडले, त्याची पुनरावृत्ती नाशिकमध्ये होते की काय? याची चर्चा आहे.

-------

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com