Aaditya Thackeray Tapovan Visit : उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची खेळी, गिरीश महाजनांची कोंडी करायला आदित्य ठाकरे 'तपोवनात'

Tapovan Nashik :माजी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांना आज नाशिकमध्ये तपोवनाला भेट दिली. पर्यावरणप्रेमींच्या आंदोलनाला पाठिंबा देत त्यांनी भाजपवर टीकेचे बाण सोडले.
Aaditya Thackeray Tapovan Visit
Aaditya Thackeray Tapovan VisitSarkarnama
Published on
Updated on

Nashik Politics : भाजपचे संकटमोचक व कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी शिवसेना ठाकरे गटाला ऐन पालिका निवडणुकीच्या तोंडावर जबर झटका दिला. ठाकरे गटाच्या दोन माजी महापौरांना गळाला लावून त्यांना भाजपमध्ये प्रवेश दिला. त्यानंतर खडबडून जागे झालेल्या शिवसेना ठाकरे गटानेही महाजन यांची कोंडी करायला सुरुवात केली असून त्याचाच भाग म्हणून आज (दि.२७) माजी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे थेट तपोवनात पोहोचले.

आदित्य ठाकरे यांनी तपोवन परिसराला भेट देत स्थानिक नागरिक व पर्यावरणप्रेमींची भूमिका जाणून घेतली. तपोवन परिसरातील पर्यावरण संरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या...'तपोवन वाचवा-नाशिक वाचवा' आंदोलनात 'जय श्रीराम' अशा घोषणांनी परिसर यावेळी दुमदुमला होता. यावेळी मोठ्या संख्येने पर्यावरण प्रेमी व ठाकरे सेनेचे उपनेते दत्ता गायकवाड, जिल्हाप्रमुख डी.जी.सूर्यवंशी, महानगरप्रमुख प्रथमेश गिते आदी यावेळी उपस्थिती होते.

तपोवन परिसरातील पाहणीनंतर आदित्य ठाकरे यांनी वृक्षांची पाहणी केली. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. तपोवनातील आंदोलनाला कोणताही राजकीय झेंडा हाती न घेता आम्ही पाठिंबा दिला आहे. नाशिककरांचे आंदोलन हे पर्यावरण रक्षणासाठी सुरु आहे. कुणाचाही कुंभमेळ्याला विरोध नाही. कुंभमेळा झालाच पाहीजे. पण तपोवन हे 'वन' आहे. तपश्चर्याचे वन आहे. तपश्चर्या ही फाईव्ह स्टार किंवा माईस अर्थात प्रदर्शन केंद्रा मध्ये बसून होत नाही. ती अशा वनातच होते. त्यामुळे झाडे कापणे चुकीचे आहे, त्याला आमचा विरोध आहे व विरोध राहणारच असं आदित्य ठाकरे म्हणाले. तपोवनातील झाडे कापायला कुणी आलं तर आम्ही मध्ये उभे राहू असा इशारा त्यांनी दिला.

Aaditya Thackeray Tapovan Visit
Ajit Pawar NCP Nashik : नाशिकमध्ये अजितदादांच्या राष्ट्रवादीला 'मविआ' सोबत जायचंय? उद्धव ठाकरेंच्या नेत्याने केला दावा..

कुंभमेळ्याला विरोध नसून MICE प्रकल्पासाठी पर्यायी जागा शोधावी तसेच तपोवन परिसराला ‘ग्रीन झोन’ घोषित करावे, अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी यावेळी केली. आपण पर्यावरण मंत्री असताना मोठ्या प्रमाणात झाडांचे संवर्धन करण्यात आल्याचा उल्लेखही त्यांनी केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तपोवनातील या वनराईला राखीव वनाचा दर्जा देण्याची मागणी आदित्य ठाकरेंनी केली.

Aaditya Thackeray Tapovan Visit
Nashik Politics : आदित्य ठाकरे डॅमेज कंट्रोलसाठी नाशिकच्या मैदानात, उरले सुरले सांभाळून ठेवण्यासाठी धडपड..

कुंभमेळ्याच्या विरोधात प्रचार होत असल्याचा आरोप भाजपकडून केला जात आहे. यावर आदित्य ठाकरे म्हणाले, आपल्या हिंदू धर्मात पंचमहाभूतांची पूजा व्हायची, तेच हे संपवायला निघाले असतील तर त्यांचा धर्म कोणता? भाजपचा धर्म बिल्डरधर्म आहे, एका चित्रफितीत नाशिकमधील एक बिल्डर मुख्यमंत्र्यांना या क्षेत्राचा झोन बदलण्यास सुचवत असल्याचे ते म्हणाले. तपोवनातील श्रेत्र येलो झोनमध्ये रुपांतरीत करुन टीडीआर घेता येईल असे सूचविल्याचा दाखला देत हे बिल्डर कोण आहेत, नाशिकप्रेमी आहेत का, कुठून आले कोणाच्या जवळचे आहेत असे प्रश्न उपस्थितीत करत भाजप सगळीकडे नैसर्गिक स्त्रोत नष्ट करायला निघाल्याचा आरोप त्यांनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com