Aam Aadmi Party : परभणीतील ‘आप’च्या कार्यकर्त्यांनी पाण्यासाठी नाशिकमध्ये येऊन केले आंदोलन, अन्...

Protest for Water : नाशिकमधील आम आदमी पक्षाच्या नेते, कार्यकर्त्यांबाबत नागरिकांमध्ये उलटसुलट चर्चा
AAP Protest
AAP Protest Sarkarnama
Published on
Updated on

किरण कवडे -

Nashik News : नाशिकचे पाणी जायकवाडीला सोडण्यासाठी परभणीच्या आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी नाशिकमध्ये येऊन आंदोलन केले. शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणाजवळच त्यांनी ठिय्या मांडल्याने प्रशासनाची ऐनवेळी भंबेरी उडाली. हा सर्व प्रकार पाच तास सुरु असताना नाशिकमधील आम आदमी पक्षाच्या एकही कार्यकर्ता किंवा नेता तिकडे त्यांना अडवण्यासाठी फिरकला नाही.

एरवी शहरातील छोट्यामोठ्या समस्यांवर आवाज उठवण्यासाठी ‘आप’चे कार्यकर्ते अग्रेसर असतात. जितेंद्र भावे यांनी तर भर करोनाच्या काळात एका हॉस्पिटलमध्ये केलेले आंदोलन आजही अनेकांच्या स्मरणात आहे. तेव्हापासून भावे वेगवेगळ्या समस्यांवर उपाय सुचवण्यासाठी शहरभर ‘लाईव्ह’ करताना दिसतात. त्यांनी आता स्वत:चा राजकीय पक्षही सुरु केला आहे. पण त्यांनाही पाण्यासाठी रस्त्यावर उतरण्याची आठवण झाली नाही. तर आपचे कार्यकर्ते कुठेही दिसेनासे झाले आहेत. याची चर्चा सुरू आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

नाशिककरांच्या पाण्याचा विषय कदाचित त्यांना फारसा महत्वाचा वाटत नसावा म्हणून ही भूमिका स्थानिक आपच्या कार्यकर्त्यांनी घेतली की काय?, अशी शंका नागरिकांमधून उपस्थित होत आहे. आपल्या नाकावर टिच्चून परभणीचे कार्यकर्ते थेट धरणावर आंदोलन करतात आणि आपण बघ्याची भूमिका घेतो, हे कुठल्या स्वरुपाचे राजकारण म्हणावे, असा प्रश्न नाशिककरांना पडला आहे.

मूळात छोट्या पक्षांचे अस्तित्व हे स्थानिक प्रश्नांच्या सोडवणूकीतून तयार होते. या प्रश्नांकडे राष्ट्रीय किंवा राज्य पातळीवरील पक्ष दुर्लक्ष करतात, म्हणून आप सारख्या पक्षांचे अस्तित्व लोकांना भावते. पण पाण्यासारख्या संवेदनशील विषय सोडून दिला तर पाण्यासोबत पक्षाचे अस्तित्व वाहून जायला फारसा वेळ लागणार नाही. याची जाणीव स्थानिक आपच्या कार्यकर्त्यांनी ठेवली तरी पुरेसे आहे, अशी भावना नागरिकांमधून व्यक्त केली जात आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

AAP Protest
Nashik Teacher Constituency Election : नाशिक शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी 53 हजार 518 मतदारांची प्रारुप मतदार यादी प्रसिध्द

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com