ACB Trap News: लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई पुन्हा एकदा चर्चेत आहे. या विभागाकडून मोठ्या प्रमाणावर कारवाई होऊनही नये लाच स्वीकारण्याचा मोह शासकीय अधिकाऱ्यांमध्ये कमी होत नाही. त्यामुळे हा सामान्यांसाठीही गंभीर विषय बनला आहे.
सुरगाणा येथील पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मंगेश गोकुळ पोतदार एसीबीच्या जाळ्यात अडकले आहेत. महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या पुरवठादाराकडे त्यांनी लाच मागितली होती. कंत्राटदाराचे २.१० कोटी रुपयांचे देयक त्यांनी अडवून धरले होते. याबाबत पुरवठादारांकडून सातत्याने पाठपुरावा सुरू होता.
पुरवठादराचे बिल अदा करण्यासाठी गटविकास अधिकारी पोतदार यांनी दोन लाख दहा हजार रुपयांची लाच मागितली. त्यानंतर पुरवठादराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. त्यानुसार सापळा रचण्यात आला. यासंदर्भात सुरगाणा पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.
नाशिकच्या एसीबी पथकाने या संदर्भात सापळा रचला होता. त्यात दोन लाख दहा हजार रुपये लाज स्वीकारताना पोद्दार अटक करण्यात आली. यासंदर्भात सुरगाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोतदार याला अटक करण्यात आली आहे. त्याच्या अन्य मालमत्तांची माहिती घेण्याचे काम एसीबीने सुरू केले आहे. लवकरच त्याच्या घराची झडती देखील घेतली जाणार आहे. एसीबीच्या पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई झाली.
एसीबीच्या पथकाकडून उत्तर महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर कारवाई केली जात आहे. त्यात अनेकांना लाज घेताना पकडल्याने हे सापळे यशस्वी देखील झाले आहे. मात्र अद्यापही शासकीय अधिकाऱ्यांमध्ये लाच स्वीकारण्याचा मोह कमी होताना दिसत नाही.
२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता कॉमस्कोअरमध्ये Number One डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातील नवी झेप
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.