Shirdi Bribe Crime: शिर्डीच्या पोलीस निरीक्षकासह पोलीस कर्मचारी लाचेच्या जाळ्यात; 'एसीबी'कडून गुन्हा दाखल

ACB In Action : एसीबीच्या नाशिक विभागाकडून शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Shirdi Bribe Crime
Shirdi Bribe CrimeSarkarnama

Ahmednagar News: शासकीय खात्यातील अधिकाराचा दुरुपयोग करत होणाऱ्या आर्थिक भ्रष्टाचारात महसूल विभागापाठोपाठ पोलीस खात्याचा नंबर लागतो, हे अनेक वर्षातील आकडेवारीतून पुढे येत आहे. अनेक चांगले अधिकारी कार्यरत असले तरी काही अधिकाऱ्यांना भ्रष्ट कारभाराची लत लागली की काय असे म्हणण्याची वेळ अनेकदा येते.

आता एका प्रकारणामध्ये कारवाई टाळण्यासाठी शिर्डी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हे संशयित म्हणून तर त्यांच्या 'विश्वासू सहकाऱ्या'वर नाशिक विभागाच्या एसीबी पथकाने शिर्डी पोलीस ठाण्यातच गुन्हा दाखल केला आहे. सध्या पोलीस निरीक्षक महोदय नॉट रीचेबल असून वरिष्ठांनी चुप्पी साधली असल्याचे दिसत आहे.

Shirdi Bribe Crime
Minister Dhananjay Munde News : एकाही शेतकऱ्याची त्रुटी राहता कामा नये, मुंडेंनी दिल्या सूचना..

शिर्डी परिसरातील एका पोलीस रेकॉर्डवर असलेल्या गुन्हेगारावर कलम 354 अंतर्गतची कारवाई टाळणे, तडीपारीचा प्रस्ताव आणि एमपीडीए (MPDA) अंतर्गत कारवाई टाळण्यासाठी एक ते दीड लाख रुपयांची मागणी शिर्डीचे पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांनी पोलीस हवालदार संदीप गडाख याच्या माध्यमातून मागितली आणि तडजोडी नंतर 30 हजार रुपयांमध्ये तडजोड केल्याची तक्रार नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली होती.

Shirdi Bribe Crime
Farmers Slept In Front Of MLA's House : रात्रभर आमदारांच्या घरासमोरच झोपले शेतकरी, पाच कोटी ७२ लाख रुपये मिळणार?

यानंतर एसीबी नाशिकच्या तपास अधिकारी उपअधीक्षक वैशाली पाटील यांनी याबाबत कारवाई करत लाचेची मागणी करणाऱ्या हवालदार संदीप गडाख यांच्या विरोधात शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. तर या प्रकरणाच्या प्राथमिक तपास अहवालात (FIR) मध्ये पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ याचा संशयित म्हणून समावेश आहे.

Edited By : Ganesh Thombare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com