Minister Dhananjay Munde News : एकाही शेतकऱ्याची त्रुटी राहता कामा नये, मुंडेंनी दिल्या सूचना..

Affected Farmers : नमो शेतकरी महासन्मान योजनेसाठी ४ हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
Minister Dhananjay Munde News
Minister Dhananjay Munde News Sarkarnama

Maharashtra Farmers News : एकीकडे पाऊस नसल्याने पिके वाया जाण्याच्या मार्गावर, दुसरीकडे सरकारी मदत, पीकविम्यासाठी द्यावा लागणारा लढा, अशा दृष्टचक्रात राज्यातील शेतकरी अडकला जात आहे. (Affected Farmers News) अशावेळी केंद्र आणि सरकारकडून शेतकऱ्यांना मिळणाऱ्या योजनांचा लाभ त्यांना मिळावा, त्रुटीअभावी ते वंचित राहू नये यासाठी कृषिमंत्री धनंजय मुंडे प्रयत्नशील आहेत.

Minister Dhananjay Munde News
Ambadas Danve On Gas Price News : `चुनावी जुमला`, गॅस स्वस्त झाला ; ठाकरे गटाची टीका..

पीएम किसान योजनेच्या धर्तीवर राज्य शासनाने घोषित केलेल्या नमो शेतकरी महासन्मान योजनेचा पहिला हप्ता लवकरच वितरित करण्यात येणार आहे. (Farmers) या अनुषंगाने सुरू असलेल्या कार्यवाहीचा आढावा मुंडे (Dhananjay Munde) यांनी आज मंत्रालयात घेतला. पावसाळी अधिवेशनात नमो शेतकरी महासन्मान योजनेसाठी ४ हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

यातून शेतकऱ्यांना दोन हप्ते वितरित करणे शक्य आहे. पावसाने ओढ दिलेल्या क्षेत्रातील अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना या रकमेचीही मदत होऊ शकते. (Maharashtra) त्यादृष्टीने तातडीने पहिला हप्ता वितरित करण्यासाठीची प्रक्रिया सुरू करण्यात येत आहे. पीएम किसान योजनेतील निकषांची पूर्तता न झालेल्या १२ लाख शेतकऱ्यांच्या त्रुटी पूर्ण करून सर्व अटींची पूर्तता करण्यासाठी राज्यात विशेष मोहीम राबवली जात आहे.

याअंतर्गत आतापर्यंत ४ लाख शेतकऱ्यांनी सर्व अटींची पूर्तता केली आहे. सर्व उर्वरित पात्र शेतकरी बांधवांनी ई-केवायसी, भूमिअभिलेख नोंदी अद्यावत करणे, बँक खात्याला आधार संलग्न करणे आदी बाबींची पूर्तता करून या दोनही योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन देखील मुंडे यांनी केले आहे. ज्या शेतकऱ्यांच्या त्रुटी अजूनही दूर झालेल्या नाहीत, त्या तातडीने पुर्ण करून घ्याव्यात, एकही शेतकऱ्याची त्रुटी राहता कामा नये, अशा सूचनाही मुंडे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com