ACB News; 7 लाखांची लाच स्विकारताना टोलच्या हिशेबनीसला अटक!

टोल नाक्याची निविदा मंजुर करण्यासाठी सात लाखांची लाच मागीतल्यावर धुळे `एसीबी`ची कारवाई
Harish Satyawati &Pradip Katiyar
Harish Satyawati &Pradip Katiyar Sarkarnama
Published on
Updated on

धुळे : (Dhule) लळिंग टोल प्लाझा व्यवस्थापनाचा ठेका मिळण्यासाठी भरलेली निविदा मंजूर करण्याकामी सात लाख रूपयांची लाच स्वीकारताना कंपनीच्या अधिकाऱ्यास लाचलुचपत प्रतिबंधक (ACB) विभागाच्या येथील पथकाने पकडले. इरकॉन सोमा टोल वे प्रा. लि. कंपनीच्या लळिंग (ता. धुळे) टोल प्लाझाजवळील मुख्य कार्यालयात मंगळवारी दुपारी ही कारवाई झाली. हरीश सत्यवली असे लाचखोर अधिकाऱ्याचे नाव आहे. (FIR registered in Dhule police against Toll plaza director)

Harish Satyawati &Pradip Katiyar
Chhagan Bhujbal News; एकनाथ शिंदे यांनी आता थांबलेलंच बरं!

या प्रकरणी लाचखोरासह इरकॉन सोमा टोल वे प्रा. लि.च्या संचालकाविरूद्ध गुन्हा दाखल झाला. संशयिताला अटकही झाली. नवी दिल्लीस्थित इरकॉन सोमा टोल वे प्रा. लि. कंपनीने नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियाकडून २८ सप्टेंबर २००५ ला बांधा, चालवा व हस्तांतरीत करा या तत्त्वावर करारनामा केला आहे. कंपनीने कोरल असोसिएटस (उदयपूर, राजस्थान) कंपनीस २२ ऑगस्ट २०२२ ला मुंबई- आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील चांदवड (जि. नाशिक) येथील टोल प्लाझाच्या संपूर्ण व्यवस्थापनाचा करारनामा केला आहे.

Harish Satyawati &Pradip Katiyar
NCP News: केंद्रात, राज्यात भाजप त्यामुळे शेतकरी रडतोय!

तक्रारदाराने चांदवड टोल प्लाझाच्या व्यवस्थापनाबद्दलच्या डिसेंबर २०२२ ते जानेवारी २०२३ कालावधीतील प्रतिपूर्तीची रक्कम अदा करण्यासाठी, तसेच कोरल असोसिएटसने लळिंग टोल प्लाझा व्यवस्थापनाचा ठेका मिळण्यासाठी भरलेली निविदा मंजूर करण्यासाठी इरकॉन सोमा टोल वे प्रा. लि. कंपनीचे हिशेबनीस व वित्त अधिकारी हरीश सत्यवली याने सात लाख रूपयांची मागणी केली. त्याने इरकॉन सोमा टोल वे प्रा. लि.चे नवी दिल्लीस्थित संचालक प्रदीप कटीयार यांच्या सांगण्यावरुन त्याच्यासाठी (कटियार) दोन लाख तसेच स्वत:साठी पाच लाख, अशी एकूण सात लाखांची लाच मागितली. लळिंग येथील इरकॉन सोमा टोल वे येथील मुख्य कार्यालयात मंगळवारी दुपारी लाच स्वीकारताना संशयित सत्यवली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे नाशिक परिक्षेत्राचे पोलिस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, अपर पोलिस अधीक्षक नारायण न्याहाळदे व वाचक पोलिस उपअधीक्षक नरेंद्र पवार, धुळे विभागाचे पोलिस उपअधीक्षक अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक प्रकाश झोडगे, मंजितसिंग चव्हाण तसेच राजन कदम, शरद काटके, संतोष पावरा, भूषण खलाणेकर, भूषण शेटे, गायत्री पाटील, रोहिणी पवार, रामदास बारेला, सुधीर मोरे, जगदीश बडगुजर, प्रशांत बागूल,मकंरद पाटील यांनी ही कारवाई केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com