Nashik Bus Accident News: साईभक्तांवर काळाचा घाला! सिन्नर व शिर्डी महामार्गावर भीषण अपघात,१० भाविकांचा दुर्दैवी अंत

Nashik Accident News: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मोठे आदेश
Nashik Accident News
Nashik Accident News Sarkarnama
Published on
Updated on

Nashik Accident News: सिन्नर ते शिर्डी महामार्गावर पाथरे गावाजवळ खासगी आराम बस आणि ट्रकची समोरासमोर धडक बसून भीषण अपघात घडला आहे. ही अपघाताची घटना शुक्रवारी (दि.१३) पहाटेच्या सुमारास घडली आहे. य अपघातात 10 साईभक्तांचा मृत्यू अनेकजण जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे.

Nashik Accident News
Chandrakant Patil News: '' मला अडचणीत आणताना विरोधक थकतात..''; चंद्रकांत पाटील असं का म्हणाले?

सिन्नर ते शिर्डी महामार्गावर पाथरे गावाजवळ झालेल्या अपघातात बस व ट्रकची धडक इतकी भीषण होती की, बसचा चक्काचूर झाला आहे. या अपघातात १० प्रवाशांचा मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी झाले आहे. अपघात घडल्यानंतर झालेल्या आवाजाने आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनी धाव घेतली.

अपघात इतका भीषण होता की, नागरिकांच्या ओरडण्याने परिसरातील गावकरी मदतीसाठी एकवटले. स्थानिक नागरिकांनी अपघातातील(Accident) जखमींना शिर्डी नाशिक, नगर येथील रुग्णालयात मिळेल त्या वाहनाने उपचारासाठी पाठविण्यात आले आहे.

Nashik Accident News
Nashik News: नाशिक पदवीधर मतदारसंघ; तांबे पिता-पुत्रांवर काँग्रेस आता काय कारवाई करणार ?

ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगरमधून 15 बस साईबाबांच्या दर्शनासाठी निघाल्या होत्या. त्यातील एका बसला झाला आहे. अपघातग्रस्त बसमध्ये ठाण्यातील अंबरनाथमधील 50 भाविक होते. ही बस मुंबईकडून शिर्डीच्या दिशेने जात असताना हा अपघात घडला. यात 10 जणांचा मृत्यू, तर उर्वरीत प्रवासी गंभीर जखमी झाले आहे.

नाशिक शिर्डी महामार्गावर वावी पाथरे गावाजवळ झालेल्या खासगी बसच्या अपघातासंदर्भात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. या अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. सरकारकडून अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहेत. जखमींच्या चौकशीसाठी मंत्री दादा भुसे हे रुग्णालयात पोहचले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com