Jalgaon News: आमदार किशोर पाटील यांचा आता करेक्ट कार्यक्रम होणार!

पाचोरा येथे ‘शिवतीर्थ’ या शिवसेना कार्यालयात बैठकीत वैशाली सूर्यवंशी यांनी मार्गदर्शन केले.
Aditya Thakre & MLA Kishor Patil
Aditya Thakre & MLA Kishor PatilSarkarnama
Published on
Updated on

पाचोरा : माजी पर्यावरण मंत्री तथा युवा सेनेचे नेते आदित्य ठाकरे (Aditya Thakre) हे मंगळवारी (ता. ९) पाचोरा (Jalgaon) येथे निष्ठा संवाद यात्रेनिमित्त येत असून, त्यांच्या खानदेश (Khandesh) दौऱ्याचा श्रीगणेशा पाचोरा येथूनच होणार आहे. या साठीची नियोजन बैठक शुक्रवारी वैशाली सूर्यवंशी (Vaishali Suryawanshi) यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. त्यात दौरा सर्वार्थाने यशस्वी करण्याचा निर्धार करण्यात आला. (Shivsena leaders are busy in success of Shivsena people connect)

Aditya Thakre & MLA Kishor Patil
MNS News: अमित ठाकरे यांच्या दौऱ्यात ‘वन टू वन’ चर्चा

येथील शिवतीर्थ हे शिवसेना कार्यालय माजी आमदार (स्व.) आर. ओ. तात्या पाटील यांच्या कन्या वैशाली सूर्यवंशी यांनी ताब्यात घेऊन त्याची दुरुस्ती व रंगरंगोटी केली व शुक्रवारी त्यांनी प्रथमच या कार्यालयात येऊन आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्यासंदर्भात नियोजन बैठक घेतली.

Aditya Thakre & MLA Kishor Patil
Congress News: मोदी सरकारचे धोरण म्हणजेच सामन्यांचे मरण!

येथील शिवसेनेचे आमदार किशोर आप्पा पाटील यांनी बंडखोरी करून एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी शक्तीपर्दर्शन देखील केले. मात्र त्यांना भगीनी वैशाली सूर्यवंशी यांच्याकडून थेट घरातूनच आव्हान मिळाले आहे. वैशाली सूर्यवंशी यांना कार्यकर्ते तसेच जनतेकडूनही शुभेच्छा दिल्या जात आहे. त्यांनी नुकतीच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यामुळे आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्याने बंडखोर आमदार किशोर पाटील यांचा करेक्ट कार्यक्रम होण्याचीच शक्यता आहे.

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या खानदेश संवाद यात्रेचा श्रीगणेशा पाचोरा येथूनच होणार असल्याने हा दौरा यशस्वी करण्यासाठी बैठकीत नियोजन करण्यात आले. त्यासाठी गावनिहाय बैठका, पदाधिकारी व निष्ठावंत शिवसैनिकांचे संघटन, बॅनर, झेंडे, सभा यासाठीचे नियोजन करण्यात आले. वैशाली सूर्यवंशी यांनी मार्गदर्शन करून आदित्य ठाकरे यांचा दौरा सर्वार्थाने यशस्वी करण्याचा निर्धार केला. याप्रसंगी वैशाली सूर्यवंशी, राजेंद्र साळुंखे, डॉ. योगेंद्रसिंह मौर्य, अनिल सावंत, अनिल पाटील, रवी चोरपगार, नाना वाघ यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.

-----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com