Advocate Couple Death Nagar : वकील दाम्पत्य हत्येचा तपास 'सीआयडी'कडे सोपवा; वकील संघटनेची मागणी

Lawyer Couple Killed in Nagar: चार आरोपींना न्यायालयाने दहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
Crime News
Crime News Sarkarnama

Nagar Crime News : राहुरी न्यायालयातील वकील दाम्पत्य राजाराम आढाव आणि त्यांच्या पत्नी मनीषा आढाव यांच्या हत्येसंदर्भात अटक करण्यात आलेल्या चौघांना न्यायालयाने दहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

वकील दाम्पत्याच्या हत्येचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे (CID) देण्याची मागणी करत या घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी आज दिवसभराच्या न्यायालयीन कामकाजावर राहुरी तालुका वकील संघटनेने बहिष्कार घातला आहे. तसेच नगर शहरातील जिल्हा न्यायालयातही वकील संघटनेने निषेध सभा घेतली. (Advocate Couple Death Nagar)

आढाव दाम्पत्याच्या हत्याकांडात सराईत गुन्हेगारासह पाच जणांची नावे समोर आली आहे. सराईत गुन्हेगार किरण नानाभाऊ दुशिंग उर्फ दत्तात्रय (वय ३२, रा. उंबरे), सागर साहेबराव खांदे ऊर्फ भैया (रा. येवले आखाडा), शुभम संजीत महाडिक (रा. गणपतवाडी शाळेजवळ, मानोरी), हर्षल दत्तात्रय ढोकणे (रा. उंबरे) या चौघांना दहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. बबन सुनिल मोरे (रा. उंबरे, सर्व रा. ता. राहुरी) याचा शोध सुरू आहे. दरम्यान, आरोपींचे वकीलपत्र कोणीच स्वीकारले नाही. (Lawyers' Association demands inquiry from State Crime Investigation Department)

Crime News
Advocate Couple Death : आधी पाच तास छळ, नंतर हत्या; वकील दाम्पत्य हत्याप्रकरणी खळबळजनक माहिती समोर

आढाव आणि त्यांची पत्नीची पाच लाख रुपयांच्या खंडणीसाठी हत्या झाल्याचे समोर आहे. यासाठी आरोपींनी त्यांचे राहुरी ( Rahuri) न्यायालयातून अपहरण केले होते. याप्रकरणी बेपत्ताची तक्रार पोलिसांकडे दाखल झाली होती. राहुरी आणि स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी तपास केल्यावर आढाव दाम्पत्यांच्या हत्येची उकल झाली.

या हत्येत अटक करण्यात आलेला सराईत गुन्हेगार किरण दुशिंग याच्याविरोधात खून, जबरी चोरी,घरफोडी, खंडणी असे गंभीर स्वरुपाचे 12 गुन्हे दाखल आहेत. याशिवाय सागर खांदे हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध दरोडा, आर्म ऍ़क्ट असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. या हत्येतील चार आरोपींना न्यायालयाने दहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, आरोपींचे वकीलपत्र कोणीच घेतले नाही. (Crime News )

आढाव दाम्पत्याच्या हत्येच्या निषेधासाठी महाराष्ट्र व गोवा बार असोसिएशनच्यावतीने आज राहुरी वकील संघटनेने न्यायालयीन कामकाजावर बहिष्कार घातला आहे. या हत्येचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे देण्याची मागणी राहुरी तालुका वकील संघटनेने केली आहे.

याशिवाय केंद्र सरकारने वकील संरक्षण कायदा दोन्ही सभागृहात मंजूर करून त्याची कठोर अंमलबजावणी करण्याची मागणी करण्यात आली. तसा ठराव राहुरी तालुका वकील संघटनेने मंजूर केला असून, तो महाराष्ट्र व गोवा बार असोसिएशनकडे पाठवला जाणार आहे. (Lawyers Association in District Court)

Crime News
Crime News : नगर जिल्हा हादरला; वकील दाम्पत्याची अपहरण करून हत्या, धक्कादायक कारण आलं समोर

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com