SDRF boat capsizes in Pravara River : पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांचा ताफा संतप्त ग्रामस्थांनी अडवला...

Pravara River SDRF Boat : अहमदनगर जिल्ह्यातील अकोले येथील प्रवरा नदीपात्रात सहा जणांचा बुडून मृत्यू झाला. यात एसडीआरएफचे तीन जवान शहिद झाले. नदीपात्रात बुडालेल्या दोघा स्थानिकांचा शोध सुरू आहे.
Radhakrishna Vikhe
Radhakrishna Vikhe Sarkarnama
Published on
Updated on

SDRF boat capsizes : अहमदनगर जिल्ह्यातील अकोले येथे एसडीआरएफ (SDRF) पथकाची बोट उलटून झालेल्या दुर्घटनेत चौघांचे मृतदेह सापडले असून, दोघांचा शोध सुरू आहे. पालकमंत्री राधाकृष्ण विखे (Radhakrishna Vikhe) तिथे आले असता त्यांचा ताफा सुगाव (ता. अकोले) येथील ग्रामस्थांनी अडवला. त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता. मंत्री विखे यांनी ग्रामस्थांचे म्हणणे ऐकत संपूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिल्यानंतर ग्रामस्थ शांत झाले.

अकोले तालुक्यातील सुगाव बुद्रुक येथे बुधवारी प्रवरा नदीपात्रात (Pravara River SDRF Boat) पोहण्यासाठी गेलेले सागर पोपट जेडगुले (वय 25, रा. धुळवड, ता सिन्नर) आणि अर्जुन रामदास जेडगुले (वय 18, रा .पेमगिरी, ता. संगमनेर) हे दोघे युवक बुडाले होते. सागरचा मृतदेह मिळाला. अर्जुनचा शोध घेण्यासाठी नाशिक (Nashik) येथील आपत्ती व्यवस्थापनाचे (SDRF)पथक सकाळी दाखल झाले. या पथकाची बोट प्रवरा पात्रात उलटली. यात स्थानिक युवकांसह सहा जण नदी पात्रातील पाण्यात बुडाले. यातील चौघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. यात तीन एसडीआरएफच्या (SDRF) जवानांचा समावेश होता.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Radhakrishna Vikhe
CM Eknath Shinde: आता आठवण कशी आली? तहानलेल्या मराठवाड्यातील शेतकऱ्यांचा मुख्यमंत्र्यांना सवाल

नदी पात्रात आज सकाळी बुडालेल्या जवानांपैकी प्रकाश नामा शिंदे, वैभव सुनील वाघ व राहुल गोपीचंद पावरा (सर्व रा. धुळे) (Dhule) या तिघांना बाहेर काढण्यात यश आले. याशिवाय बुडालेला स्थानिक युवक गणेश मधुकर देशमुख आणि अर्जुन जेडगुले याचा शोध सुरू आहे. नदी पात्राच्या पाण्यातून बाहेर काढलेले पंकज पवार, अशोक पवार, मनोज शिंपी, अखिलेश महाजन यांच्यावर अकोले येथील स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती स्थिर आहे. Six people drowned in Pravara riverbed in Akole Ahmednagar district

या घटनेनंतर सुगाव बुद्रुकचे स्थानिक ग्रामस्थ आक्रमक झाले. नदी पात्रातील पाण्याचा प्रवाह कमी करण्याची मागणी केली. संतप्त झालेल्या स्थानिक नागरिकांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे (Radhakrishna Vikhe) यांचा ताफा अडवला. नदी पात्रातील पाण्याचा प्रवाह का कमी करत नाही, असा प्रश्न ग्रामस्थांनी केला. तसेच बचाव कार्य खूप सावकाश चालू आहे, अशी देखील तक्रार ग्रामस्थांनी केली. माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात, आमदार डॉ. किरण लहामटे, माजी आमदार वैभवराव पिचड, खासदार सदाशिवराव लोखंडे यांनी घटनास्थळी भेट दिली. याशिवाय जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ, पोलिस महासंचालक बी. जी. शेखर, पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी घटनास्थळाची धाव घेऊन नियोजन केलं.

Radhakrishna Vikhe
Loksabha Election 2024 : चंद्रपूरची ही १२ गावे करणार दोनदा मतदान; काय आहे कारण...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com