Nashik Teacher Constituency Election : शिक्षक एकवटले, 'टीडीएफ'चे पदाधिकारी अन् त्यांचा उमेदवारही अनधिकृत...

Nashik Teachers Election : नगर, जळगाव, नाशिक, धुळे, नंदुरबार जिल्ह्यातील 'टीडीएफ'च्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करुन शिक्षण क्षेत्रात कार्यरत व 'टीडीएफ'मधील सक्रिय शिक्षकाला सर्वानुमते उमेदवारी जाहीर केली जाणार असल्याची घोषणा सहविचार सभेत करण्यात आली.
Nashik Teacher Constituency election
Nashik Teacher Constituency electionsarkarnama

Nagar News : महाराष्ट्र शिक्षक लोकशाही आघाडीमध्ये (टीडीएफ) फूट पडली असून, त्यातील एक गट माध्यमिक शिक्षक संघाच्या सहविचार सभेत सहभागी झाला. नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी (Nashik Teacher Constituency Election) 'टीडीएफ'च्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करुन शिक्षण क्षेत्रात कार्यरत आणि 'टीडीएफ'मधील सक्रीय शिक्षकाला सर्वानुमते उमेदवारी जाहीर करणार असल्याची घोषणा सहविचार सभेत करण्यात आली. 'टीडीएफ'चे पदाधिकारी अधिकृत नाही, त्यांनी घोषणा केलेला उमेदवारही अनधिकृत आहे, असे यावेळी सांगण्यात आले.

नाशिक (Nashik) विभाग शिक्षक मतदार संघातून 'टीडीएफ'ने निवृत्त शिक्षक भाऊसाहेब कचरे यांना उमेदवारी जाहीर केल्याने 'टीडीएफ'मध्ये नवा वाद पेटला असून, फूट पडली आहे. सक्रिय 'टीडीएफ'चे (TDF) पदाधिकारी बाहेर पडले असून, सर्वांच्या सहमतीने नवीन उमेदवार देण्याच्या तयारीत केली आहे. नगर शहरातील माध्यमिक शिक्षक सोसायटीत राज्य माध्यमिक शिक्षक (Teacher) संघटना फेडरेशनचे उपाध्यक्ष चांगदेव कडू यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सहविचार सभेसाठी 'टीडीएफ'चे जिल्हाध्यक्ष एम. एस. लगड, माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष आप्पासाहेब शिंदे, सचिव राजेंद्र खेडकर उपस्थित होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Nashik Teacher Constituency election
Nashik Teacher Constituency Election : निवडणूक शिक्षक मतदारसंघाची, आमदार कोण होणार शिक्षक की, संस्थाचालक..?

महाराष्ट्र शिक्षक लोकशाही आघाडीचे अध्यक्ष नानासाहेब बोरस्ते नसून विजय बहाळकर आहेत. महासचिव पद संघटनेच्या कार्यकारिणीत नाही. परंतु सध्या स्वयंघोषित असलेले बोरस्ते आणि हिराला पगडाल यांनी नाशिक विभागाची उमेदवारी जाहीर करताना पुणे (Pune) येथे पाच लोक उपस्थित होते, असा आरोप यावेळी झाला. उमेदवारी जाहीर करताच इतर चार जिल्ह्याचे अध्यक्षांनी निषेध नोंदवत निघून गेले. नाशिक विभागातील नगर, जळगाव, नाशिक, धुळे (Dhule), नंदुरबार या पाचही जिल्ह्यामधून 'टीडीएफ'मधील सक्रिय पदाधिकारी एकत्र बसून उमेदवारीबाबत निर्णय घेणार असल्याचे बैठकीत स्पष्ट करण्यात आले. There was a split in the Maharashtra Teachers Democratic Alliance (TDF)

एम. एस. लगड यांनी 'टीडीएफ'च्या (TDF) उमेदवाराची समन्वय समितीने विश्‍वासात न घेता नाशिक शिक्षक आमदार निवडणुकीसाठी उमेदवार जाहीर केला आहे. दिलेला उमेदवार आम्हाला मान्य नाही. अधिकृत उमेदवार सर्वांना विचारात घेऊन जाहीर केला जाणार आहे. भाऊसाहेब कचरे यांना नगर जिल्हा टीडीएफ व माध्यमिक शिक्षक संघाचा पाठिंबा नसल्याचे सांगितले. आप्पासाहेब शिंदे यांनी ज्यांनी उमेदवारी जाहीर केली त्यांना 'टीडीएफ'चा उमेदवार जाहीर करण्याचा अधिकार नाही. कार्यरत शिक्षकाला उमेदवारी मिळावी आणि तो निवडून यावा हीच सर्वांची भूमिका असल्याचे सांगितले. मुश्ताक सय्यद यांनी आर्थिक देवाण-घेवाण करुन 'टीडीएफ'ची उमेदवारी जाहीर करण्यात आल्याचा आरोप केला.

Nashik Teacher Constituency election
Eknath Khadse News : एकनाथ खडसेंचा प्रवास सक्तीच्या राजकीय निवृत्तीकडे? पक्षप्रवेशासाठी ताटकळले

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com