Agasti Sugar Factory Election : अगस्ती कारखान्याच्या उपाध्यक्षपदासाठी 'या' नावांची चर्चा; सुनीता भांगरेंना मिळणार का संधी?

Agasti Cooperative Sugar Factory Vice President Election : या निवडणुकीकडे अकोलेकरांचे लक्ष लागले आहे.
Agasti Sugar Factory Election
Agasti Sugar Factory Election Sarkarnama
Published on
Updated on

अहमदनगर : अकोले तालुक्यामधील अगस्ती सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष अशोक भांगरे यांचं काही दिवसापूर्वी निधन झालं. त्यामुळे त्यांच्या रिक्त झालेल्या जागेवर त्यांच्या पत्नी सुनीता भांगरे यांची बिनविरोध संचालकपदी निवड झाली.

पण अगस्ती सहकारी साखर कारखान्याच्या उपाध्यक्ष पदावर कुणाची वर्णी लागणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. असे असतानाच सुनीता भांगरे यांनाच ही जबाबदारी देण्यात येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. याबाबतची अधिकृत घोषणा 6 एप्रिलला होणार आहे.

Agasti Sugar Factory Election
Kunal Tilak on Chandrakant Patil : चंद्रकांतदादांच्या 'त्या' विधानाला कुणाल टिळकांचा आक्षेप; म्हणाले...

जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी म्हणून अहमदनगर येथील प्रादेशिक सहसंचालक तथा अध्यासा अधिकारी मिलिंद भालेराव यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड पार पडणार आहे.

कारखान्याचे कार्यकारी संचालक अजित देशमुख यांनी याबाबत विषयपत्रिका संचालक मंडळाला अवगत केली आहे. त्यानुसार उपाध्यक्षपदी नैसर्गिक न्यायानुसार सुनीता भांगरे यांचीच निवड होण्याची औपचारिकता बाकी आहे.

Agasti Sugar Factory Election
Pimpri-Chinchwad Politics : राहुल गांधींवरून पिंपरीतील राजकारण तापलं; भाजप अन् काँग्रेस भिडले

दरम्यान, कैलास वाकचौरे, मीनानाथ पांडे यांची नावे देखील उपाध्यक्ष पदाच्या शर्यतीत आहेत. मात्र, सुनीता भांगरे यांनाच ही जबाबदारी देण्यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे अकोलेकरांचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com