पिंपरी : राहूल गांधीची खासदारकी रद्द करण्याचे व त्यांच्या सावरकरांविषयीच्या वक्तव्याचे जोरदार पडसाद पिंपरी-चिंचवडला उमटू लागले आहेत. गांधींच्या विरोधात "आम्ही सारे सावरकर" चे फलक भाजपने शहरात लावले. तर, काँग्रेसने गांधीचे पद रद्द केल्याच्या निषेधार्थ भाजपविरुद्ध जनआंदोलन केले.
महाराष्ट्रात वीर सावरकर या विषयावर वादळ उठले असताना "मी सावरकर" या आशयाचे बॅनर विविध ठिकाणी शहरात झळकल्याने त्याची चर्चा आहे. भाजपचे प्रदेश सचिव अमित गोरखे यांनी ते लावले आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याकडून वारंवार स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान केला जात असल्याच्या निषेधार्थ भाजप आणि शिवसेनेच्यावतीने "आम्ही सारे सावरकर" ही मोहीम सुरू केली असल्याचे त्यांनी सांगितले.
स्वातंत्र्यवीरांचा जाणीवपूर्वक होणारा अवमान यापुढे सहन केला जाणार नाही, असा इशारा त्यांनी दिला आहे. "देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आयुष्याची होळी करणारे क्रांतीकारक सावरकरांविषयी सातत्याने अपमानास्पद वक्तव्य करून करोडो देशभक्तांच्या भावना दुखावल्या जात आहेत. त्यामुळे हे अभियान सुरू करण्यात केले आहे", असे ते म्हणाले.
राहुल गांधींच्या समर्थनार्थ काँग्रेसचे जनआंदोलन
राहुल गांधी यांच्यावरील एकतर्फी, द्वेषभावनेतून, सूडभावनेतून, जनतेचा आवाज दाबण्याच्या, लोकशाही मूल्ये विरोधी आणि हुकूमशाही स्वरूपाच्या खासदारपद रद्द करण्याच्या मोदी सरकारच्या कारवाईच्या आणि संविधानविरोधी कृत्यांच्या निषेधार्थ काँग्रेसने आजपासून जनआंदोलन छेडले आहे.
त्याच्या पहिल्या टप्यात आजपासून स्वाक्षरी मोहीम सप्ताह सुरु करण्यात आला आहे. त्याजोडीने आज संकल्प सत्याग्रह करण्यात आला. उद्या शहरातून मूक मोर्चा काढण्यात येणार असून २ तारखेला "जेल भरो आंदोलन" केले जाणार असल्याचे काँग्रेसचे शहराध्यक्ष डॉ.कैलास कदम यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.