Manikrao kokate: मला रमी खेळताच येत नाही, मला बदनाम करणाऱ्यांना मी कोर्टात खेचणार; कोकाटे संतापले

Manikrao kokate Controversial Video News Update: मी कुणाचा विनयभंग केला आहे का? राजीनामा देण्याचे काय कारण, असे सांगत राजीनामा देणार नसल्याचे त्यांनी माध्यमांना सांगितले.
Manikrao Kokate
Manikrao KokateSarkarnama
Published on
Updated on

ऑनलाइन कार्डच्या गेममुळे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर विरोधकांना आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. त्यांना राजीनामा देण्यास भाग पाडले जाईल,अशी चर्चा सुरु आहे.

यावर माणिकराव कोकाटे यांनी पत्रकार परिषदेत स्पष्टीकरण दिले आहे. मी एकाही रुपयांची रमी खेळलो नाही, मला बदनाम करण्याचा विरोधकांचा हा डाव आहे.ज्यांची मला बदनाम केले त्यांना मी कोर्टात खेचणार, असे कोकाटे यांनी सांगितले. मला रमी खेळताच येत नाही, असे ते म्हणाले.

मी कुणाचा विनयभंग केला आहे का? राजीनामा देण्याचे काय कारण, असे सांगत राजीनामा देणार नसल्याचे त्यांनी माध्यमांना सांगितले. या प्रकरणाची चौकशी करण्याचे पत्र मी देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Manikrao Kokate
Prafull Lodha: हनी ट्रॅप प्रकरणात प्रफुल्ल लोढाचा पुण्यातील कारनामा उघड, बावधनमध्ये गुन्हा दाखल

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोकाटेंच्या या व्हिडिओंवर नाराजी व्यक्त केली आहे. त्यावर कोकाटे म्हणाले की फडणवीसांना मीडीयावर विश्वास ठेवून प्रतिक्रिया दिली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याबाबत मी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विधानसभेचे अध्यक्ष, विधान परिषदेचे सभापती यांना पत्र देणार आहे.

या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची विनंती मी मुख्यमंत्र्यांना करणार आहे, यात मी दोषी आढळलो तर मी राजीनामा देईन, असे कोकाटे म्हणाले.

कोकाटे म्हणाले, "हा खूप छोटा विषय आहे, तो एवढा का लांबवला, मला माहीत नाही. यापूर्वी ही यावर खुलासा केला आहे. ऑनलाइन रमी खेळण्यासाठी मोबाईल क्रमांक कनेक्ट करावा लागतो, त्याला बँकेचं अकाऊंटही संलग्न करावं लागतं, माझे बँक खाते, मोबाईल क्रमात तपासा, मी माझा मोबाईल,बँक खाते त्याला कनेक्ट नाही, मी एक रुपयांचीही रमी खेळलो नाही. माझ्यावर करण्यात आलेले सर्व आरोप हे बिनबुडाचे आहे. ज्यांनी मला बदनाम केले त्यांना मी कोर्टोत खेचणार आहे,"

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com