Prafull Lodha: हनी ट्रॅप प्रकरणात प्रफुल्ल लोढाचा पुण्यातील कारनामा उघड, बावधनमध्ये गुन्हा दाखल

Prafull Lodha Honeytrap Case FIR in Pune: कोथरूडमध्ये राहणाऱ्या एका ३६ वर्षीय महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, २७ मे २०२५ रोजी रात्री लोढा याने तिला पतीसाठी नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका हॉटेलमध्ये बोलावले. त्यावेळी त्याने शारीरिक संबंध ठेवण्याची अट घातली.
Eknath Khadse girish mahajan Praful Lodha .jpg
Eknath Khadse girish mahajan Praful Lodha .jpgSarkarnama
Published on
Updated on

Pune News : हनी ट्रॅप आणि मुंबईतील अंधेरी एमआयडीसी आणि साकीनाका पोलिस ठाण्यांमध्ये अल्पवयीन मुलींवर अत्याचार प्रकरणात गुन्हे दाखल असलेल्या प्रफुल्ल लोढा याच्याविरोधात आता बावधन पोलिस ठाण्यातही बलात्काराचा आणखी एक गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रफुल्ल लोढा याच्यावर यापूर्वी १६ वर्षीय मुलीसह तिच्या मैत्रिणीवर नोकरीचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार, धमकी, आणि अश्लील फोटो काढण्याचे आरोप करण्यात आले होते. या प्रकरणांमध्ये ३ जुलै रोजी साकीनाका पोलिसांनी पोस्को कायदा, बलात्कार, खंडणी व फसवणुकीचे कलम लावून गुन्हा नोंदवला होता. यानंतर १४ जुलै रोजी अंधेरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात देखील 'हनी ट्रॅप'च्या प्रकाराशी संबंधित गुन्हा दाखल करण्यात आला.

सध्या लोढा मुंबई पोलिसांच्या ताब्यात असून, ५ जुलै रोजी त्याला अटक करण्यात आली आहे. दरम्यान, १७ जुलै रोजी कोथरूडमध्ये राहणाऱ्या एका ३६ वर्षीय महिलेने बावधन पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, २७ मे २०२५ रोजी रात्री लोढा याने तिला पतीसाठी नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवून बालेवाडीमधील एका हॉटेलमध्ये बोलावले. त्यावेळी त्याने शारीरिक संबंध ठेवण्याची अट घातली. पीडित महिलेने नकार दिल्यानंतर त्याने तिची देखील नोकरी घालवण्याची धमकी दिली व जबरदस्तीने तिच्यावर बलात्कार केला, असा आरोप आहे.

Eknath Khadse girish mahajan Praful Lodha .jpg
Vaibhav Taneja: वैभव तनेजा यांचा अमेरिकेत डंका! एलॉन मस्क यांच्या पार्टीच्या कोषाध्यक्षपदी निवड

या तक्रारीच्या आधारावर बावधन पोलिसांनी बलात्कार व धमकी देण्याचे गुन्हे नोंदवले असून, प्रकरणात पुढील तपास सुरू आहे. लवकरच मुंबई पोलिसांकडून आरोपीचा ताबा घेण्याची प्रक्रिया होणार असल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल विभुते यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com