Manikrao Kokate : भुजबळांच्या बालेकिल्ल्यात कोकाटेंचे जंगी स्वागत; म्हणाले, "माझ्यावरही अन्याय झाला..."

Manikrao Kokate Vs Chhagan Bhujbal : कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा माजी मंत्री छगन भुजबळ यांच्या मतदारसंघात सत्कार झाला. या सत्काराला लासलगाव परिसरातील 46 गावांमधील नागरिकांचा उस्फूर्त प्रतिसाद होता. या निमित्ताने भुजबळ विरोधक एकत्र आल्याचे चित्र निर्माण झाले.
Chhagan Bhujbal, Manikrao Kokate
Chhagan Bhujbal, Manikrao KokateSarkarnama
Published on
Updated on

Nashik News, 25 Dec : कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना टीकेचे लक्ष्य केले होते. या पार्श्वभूमीवर कृषी मंत्री कोकाटे यांचा मंगळवारी भुजबळ यांच्या येवला मतदारसंघात दौरा झाला. राजकीय दृष्ट्या हा कार्यक्रम चर्चेचा विषय आहे.

कृषी मंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांचा माजी मंत्री छगन भुजबळ यांच्या मतदारसंघात सत्कार झाला. या सत्काराला लासलगाव परिसरातील 46 गावांमधील नागरिकांचा उस्फूर्त प्रतिसाद होता. या निमित्ताने भुजबळ विरोधक एकत्र आल्याचे चित्र निर्माण झाले. त्यामुळे या मतदारसंघात आगामी राजकारणाचे संकेत मिळाले आहेत.

यावेळी कृषी मंत्री कोकाटे यांनी आपण नेहमीच रिस्क घेत आलो आहे. सध्याही जे खाते मिळाले आहे. ती मोठी जबाबदारी आणि आव्हान आहे. त्यामुळे सतत कार्यरत राहावे लागेल. आयुष्यात मी प्रत्येक वळणावर आणि राजकारणात रिस्क घेत आलो आहे. गरज पडेल तेव्हा पक्ष बदलत आलो आहे.

त्यात मतदारसंघाच्या हिताचा विचार होता. त्यामुळेच आज राजकीय प्रवासात मंत्रिपदाला गवसणी घालता आली. मी देखील पहिल्याच टर्ममध्ये राज्यमंत्री होऊ शकलो असतो. मात्र राजकीय डावपेचांमुळे माझ्यावर अन्याय झाला, असे कृषि मंत्री कोकाटे म्हणाले.

अशोक होळकर मंत्रिमंडळाच्या पुढाकाराने हा सत्कार झाला. यावेळी बाजार समितीचे सभापती बाळासाहेब क्षिरसागर राजेंद्र ढोकळे, जगदीश होळकर, द्राक्ष बागायतदार संघाचे अध्यक्ष कैलास भोसले, मुकुंद होळकर, जयदत्त होळकर यांचे विविध नेते उपस्थित होते.

Chhagan Bhujbal, Manikrao Kokate
Maharashtra Congress : काँग्रेससमोरचं मोठं आव्हान; प्रचंड बहुमत असलेल्या सरकारला भिडणाऱ्या प्रदेशाध्यक्षाचा शोध...

विशेष म्हणजे या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे विश्वासू म्हणून मिरवणाऱ्या नेत्यांनीच पुढाकार घेतला होता. लासलगाव परिसरातील 46 गावात मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण (Maratha Reservation) आंदोलनाला मोठा प्रतिसाद होता. या सर्व मंडळींनी भुजबळ यांना काही ठिकाणी गाव बंदी देखील केली होती.

मात्र, भुजबळ (Chhagan Bhujbal) या भागातही काही गावांमध्ये आघाडीवर राहिले. कृषि मंत्री कोकाटे यांच्या सत्काराच्या निमित्ताने भुजबळ विरोधकांना एक नवा आधार मिळाला आहे. या कार्यक्रमातच मंत्री कोकाटे यांनी होळकर यांना बळ द्यावे, असे उघड आवाहन करण्यात आले. त्यामुळे आगामी राजकारणाची दिशा स्पष्ट झाली.

Chhagan Bhujbal, Manikrao Kokate
Mahayuti Poliitics : "माझं मंत्रीपद साईबाबा ठरवतात, मी मंत्र्यांपेक्षाही वरच्या पदावर जाणार..." मंत्रिपद न मिळालेल्या शिंदेंच्या नेत्याला विश्वास

येवला (Yevla) मतदारसंघात माजी मंत्री भुजबळ यांच्या विरोधकांची कोंडी करण्यासाठी भुजबळ विधानसभा निवडणुकीनंतर सक्रिय होते. आता मंत्रिमंडळाबाहेर असल्याने सत्तेचे केंद्र म्हणून कृषी मंत्री कोकाटे यांच्याकडे हे सर्व कार्यकर्ते आकर्षित होणार आहेत. या निमित्ताने माजी मंत्री भुजबळ यांच्या येवला मतदार संघात राजकारण कुस बदलणार हे स्पष्ट आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com