Ahilaynagar Ward Delimitation: अहिल्यानगर महापालिकेत प्रभाग वाढणार; रचना बदलणार असल्याने इच्छुकांच्या घाई गडबडीला ब्रेक!

Ahilaynagar Municipal Ward Structure Likely to Expand After Upcoming Changes : अहिल्यानगरमधील महापालिका प्रारूप प्रभाग रचना करण्याच्या तयारीला लागली असून, प्रभाग नव्याने वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Ahilaynagar ward delimitation
Ahilaynagar ward delimitationSarkarnama
Published on
Updated on

Ahilaynagar Municipal Corporation: महापालिका, नगर परिषदा आणि नगर पंचायतींच्या प्रभाग रचना तयार करण्याची कार्यवाही तातडीने सुरू करण्याचा आदेश निवडणूक आयोगाने राज्य सरकारला नुकताच दिला. त्यानुसार आता राज्य सरकारच्या नगर विकास विभागाने ‘ड’ वर्ग महापालिकांना प्रारूप प्रभाग रचना तयार करण्याचा आदेश दिला आहे.

महापालिका आयुक्तांनी प्रारूप प्रभाग रचना तयार करून ती जिल्हाधिकाऱ्यांना सादर करणार आहेत. यानुसार अहिल्यानगर महापालिका प्रारूप प्रभाग रचना करण्याच्या तयारीला लागली असून, दोन ते तीन प्रभाग नव्याने वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे सध्याच्या प्रभागांच्या रचनेत फेरबदल होण्याचे संकेत मिळाल्याने इच्छुकांच्या तयारीचा गोंधळ उडाला आहे.

अहिल्यानगर महापालिकेची 2018 मध्ये 17 प्रभागांसाठी निवडणूक पार पडली होती. एका प्रभागात चार याप्रमाणे 68 नगरसेवक नगरकरांनी निवडून दिले होते. आता पुन्हा एकदा या निवडणुकीचे (Election) बिगुल वाजले आहे. प्रभाग रचना तयार करण्याचा आदेश राज्य निवडणूक आयोगाने काही दिवसांपूर्वीच राज्य सरकारला दिले होते. परंतु यासंदर्भात महापालिकांना कोणतेही आदेश प्राप्त झालेले नव्हते.

नगर विकास विभागाने राज्यातील ‘ड’ वर्ग महापालिकांना (Corporation) प्रारूप प्रभाग रचना तयार करण्याचे आदेश दिले आहेत. अहिल्यानगर महापालिकेला देखील हा आदेश प्राप्त झाला आहे. त्यानुसार ही प्रारूप प्रभाग रचना तयार करण्याचा अधिकार आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांना आहेत.

Ahilaynagar ward delimitation
Gopinath Munde Memorial Controversy: 'AIMIM' इम्तियाज जलील यांना थेट बीड, परळीतून धमक्या; काय होतं कारण...

आयुक्त डांगे यांनी तयार केलेली प्रारूप प्रभाग रचना जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांना सादर करावी लागणार आहे. त्यानंतर या प्रारूप प्रभाग रचनेवर हरकती मागवल्या जाणार आहेत. त्यानंतर जिल्हाधिकारी यांच्यामार्फत ही प्रारूप प्रभागांची यादी राज्य निवडणूक आयोगाला सादर करण्यात येणार आहेत.

Ahilaynagar ward delimitation
PMC Election 2025: म्हणून पुण्यात एक नगरसेवक कमी; अशी असेल नवी प्रभाग रचना, पिंपरी चिंचवडसाठी जुनी प्रभाग रचना

दरम्यान, अहिल्यानगर शहरात वाढीव मतदारांची संख्या गृहीत धरल्यास दोन ते तीन प्रभाग नव्याने वाढण्याची शक्यता आहे. त्यावर अनेकांचे राजकीय भवितव्य ठरणार आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. अहिल्यानगर महापालिकेत गेल्या दीड वर्षापासून 'प्रशासक राज' सुरू आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com