
Ahilaynagar police action : कोपरगाव शहर व तालुक्यात अवैध मटका जुगार अड्ड्यांवर अहिल्यानगर इथल्या विशेष पथकानं मोठी धडक कारवाई करत दोन ठिकाणांहून तब्बल 14 लाख 13 हजार 680 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या दोन्ही कारवाई 30 जणांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आली.
कोपरगावमधील माजी नगरसेवक आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा माजी पदाधिकाऱ्यांचा गुन्ह्यात समावेश आहे. कारवाईतील गुन्हेगारांच्या संख्येमुळे आणि त्यातील प्रतिष्ठांच्या सहभागामुळे विशेष पथकाच्या कारवाईबाबत चर्चेला तोंड फुटलं आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी कोपरगावमधील गुन्हेगारी गाजली होती. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर कोपरगावमध्ये फैलावलेल्या अवैध धंद्यांना नेमकं कोणाचं बळ आहे, या कारवाईमुळे चर्चांना तोंड फुटलं आहे.
पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या नेतृत्वाखाली प्रशिक्षणार्थी पोलिस उपअधीक्षक संतोष खाडे यांच्या पथकाने कोपरगाव (Kopargaon) तालुक्यातील येसगाव इथं जुगारावर छापा घातला. यात 11 लाख 19 हजार 230 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. तसेच 19 आरोपींना ताब्यात घेतलं. कारवाई दरम्यान, चार जण पसार झाले.
याचवेळी, कोपरगाव शहरातील रवींद्र ढोक आणि शंकर वाणी चालवत असलेल्या मटका जुगाराव देखील छापा घालण्यात आला. तिथं सहा जणांना ताब्यात घेतलं. पथकाने 2 लाख 94 हजार 450 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. वाणी आणि ढोक याच्यासह गणेश अंबादास लकारे (रा. कहार गल्ली), संतोष सिद्धप्पा चवंडके ऊर्फ गेंड्या (रा. जेऊर पाटोदा), स्वप्नील रमेश घुमरे (रा. महादेव नगर) आणि इस्माईल आमीन शेख (रा. गांधीनगर) या पाच जणांना ताब्यात घेण्यात आले. यात चवंडके हा राष्ट्रवादीचा (NCP) माजी नगरसेवक आहे. लकारे हा माजी उपशहराध्यक्ष असल्याची माहिती समोर येत आहे.
येसगाव इथंल्या जुगारावर कारवाईत रवींद्र माधव सानप, बबलू माधव सानप, जनार्धन रामदास खरसे, प्रवीण भाऊसाहेब डोखे, जितेंद्र बळीराम पहिलवान, युवराज भगवान शिंदे, प्रवीण दत्तात्रय आहेर, देवा काशिनाथ पुरे, युवराज भगवान शिंदे, दिलीप चिमाजी गायकवाड, हिरालाल यादव चंद्रा, राजेंद्र गंगाधर सोनगिरे, मारुती सुखदेव जाधव, शिवाजी छबू आहेर, संजय पोपट मोरे, वाल्मिक रंगनाथ पर्वत, संतोष चांगदेव साताळकर, प्रवीण ठकाजी खोकले, विकास एकनाथ घोडेराव, रविंद्र सूर्यभान उशीर, बापू अशोक पवार यांना जुगार खेळताना पकडले आहे. छापा घातला, त्यावेळी चार जण पसार झाले.
राज्यात सध्या बीडमधील राजकीय गुन्हेगारी चर्चेत आहेत. राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांना त्याचा निकटवर्तीय वाल्मिक कराडमुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यांचे मंत्रिपद देखील गेले आहे. यातच अहिल्यानगरच्या कोपरगावमधील जुगार अड्यावरील छाप्यात स्थानिक लोकप्रतिनिधीचे निकटवर्तीयांविरोधात गुन्हा नोंद झाल्याने चर्चेला तोंड फुटलं आहे.
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोपरगावमधील गुन्हेगारी चर्चेत आली होती. पोलिस मुख्यालयापासून शेकडो किलोमीटर दूर असलेल्या कोपरगाव शहरात विशेष पथकाने येऊन दोन ठिकाणी कारवाई केल्याने स्थानिक पोलिसांच्या राजकीय संबंधांची देखील चर्चा सुरू झाली आहे.
कोपरगावमधील अवैध धंद्यांना कोणाचे संरक्षण आहे, याची चर्चा आता सुरू आहे. जुगार अड्यावर राजकीय पदाधिकारी खेळताना आढळतात, तर अशा अवैध धंद्यांना राजकीय संरक्षण तर नाही ना, अशी देखील चर्चा आहे. जुगार अड्ड्यावरील कारवाई राष्ट्रवादीचे माजी पदाधिकारी आढळले आहेत. कोपरगावमधील लोकप्रतिनिधी देखील राष्ट्रवादीशी निगडीत आहेत. स्थानिक पोलिस यंत्रणा देखील राजकीय दबावात असल्याने, पोलिसांच्या निष्क्रियेतवर चर्चा सुरू झाली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.