
Ahilyanagar news : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची त्रिशताब्दी जयंती साजरी होते आहे. महायुती सरकार देखील त्यांना अभिवादन करण्यासाठी थेट मंत्रिमंडळाची बैठक त्यांच्या जन्मस्थानी घेत आहे. यानिमित्ताने सरकारने एकल महिला पुनर्वसन हा कार्यक्रम हाती घ्यावा.
एक एकल महिला किती मोठे कर्तृत्व गाजवू शकते याच्या त्या वस्तुपाठ आहेत. एकल महिलांसाठी त्या प्रेरक आहेत. त्यांच्या स्मरणार्थ सरकारने राज्यातील एकल महिलांच्या पुनर्वसनाचे धोरण राबवावे, अशी मागणी साऊ एकल महिला समितीचे राज्य निमंत्रक हेरंब कुलकर्णी यांनी केली आहे.
राज्यात विधवा, परित्यक्ता, घटस्फोटित महिलांची (Women) संख्या खूप मोठी आहे. या महिलांचे पुनर्वसन करण्यासाठी, तसेच धोरण आखण्यासाठी त्यांची संख्या पुढे येणे आवश्यक आहे. त्यामुळे राज्यातील एकल महिलांचे सर्वेक्षण होणे आवश्यक आहे. अहिल्यादेवी यांच्या स्मरणार्थ तसे धोरण तयार करता येईल. देशाच्या 2001च्या जनगणनेत एकल महिला 5 कोटी, तर 2011मध्ये 7 कोटी 30 लाख होत्या. महाराष्ट्रात आज ही संख्या मोठी असू शकते.
अहिल्यादेवी यांचे जन्मस्थान, अहिल्यानगर जिल्ह्यात आहे. त्या अहिल्यानगर जिल्हा परिषदेने दोन वर्षापूर्वी ग्रामपंचायत स्तरावर एकल महिलांचे सर्वेक्षण केले. तेव्हा केवळ ग्रामपंचायत स्तरावर या एकल महिलांची संख्या एक लाख 7 हजार निघाली. त्यात 14 तालुक्यातील नगरपंचायत, नगरपालिका, महापालिका ही संख्या मिळवली, तर ती संख्या 2 लाख असू शकते. जर एका जिल्ह्यात 2 लाख एकल महिला असतील, तर राज्यातील (Maharashtra) 36 जिल्ह्यात एकल महिलांची संख्या 70 लाखापेक्षा अधिक असू शकते.
पुणे, मुंबई, नागपूर, संभाजीनगर सारख्या मोठ्या शहरातील मोठी संख्या बघता एकूण संख्या 80 लाखापेक्षा अधिक असू शकते. त्यांच्यावर अवलंबून असणारी दोन मुले धरली, तर राज्याच्या लोकसंख्येत ही संख्या लक्षणीय आहे. हे सर्वेक्षण करण्यासाठी फार खर्च येणार नाही. ग्रामपंचायत क्षेत्रात त्या छोट्या गावात ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका, आशा सेविका यांच्याकडे गावातील एकल महिला माहिती असते. ती केवळ वयोगटानुसार संकलित करायची आहे. शहरी भागात वॉर्ड ऑफिसर, अंगणवाडी व स्वयंसेवी संस्था मदत करू शकतील व एकल महिलाना नोंदणीसाठी ॲपद्वारे आवाहन करता येईल. अहिल्यादेवी यांच्या 300व्या जयंती निमित्त एकल महिलांच्या प्रश्नावर सर्वेक्षणाची घोषणा सरकारने करून कृती कार्यक्रम जाहीर करावा, अशी मागणी हेरंब कुलकर्णी यांनी केली आहे.
शेतकरी आत्महत्येत मृत्यू झालेले 50 हजार शेतकरी (अपात्र आत्महत्येची संख्या अधिक आहे), कोरोनात महाराष्ट्रात झालेले सर्वात जास्त मृत्यू आणि दारूने गावोगावी मोठ्या संख्येने मरणारे तरुण बघता ही एकल महिलांची संख्या वाढलेली आहे. त्यामुळे एकल महिलांसाठी धोरण तयार करण्यासाठी सरकारने सुरुवात म्हणून राज्यात एकल महिलांचे सर्वेक्षण करून अहिल्यादेवी यांच्या स्मरणार्थ भरीव कृती करावी, अशी मागणी हेरंब कुलकर्णी यांनी केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.